साखरपुड्यात पाहुण्यांच्या भेटीगाठी, जाताना चुलता-पुतण्यासोबत भयंकर घडलं, सारं गाव हळहळलं.

 सातारा जिल्ह्यातील शिरवळ-लोणंद रस्त्यावर भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. अमोल चव्हाण आणि धनंजय चव्हाण हे दोघे चुलते-पुतणे होते.सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी येथे एसटी बस थांब्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत चुलत्या-पुतण्या जागीच ठार झाले. अमोल रघुनाथ चव्हाण (वय 40) व धनंजय बबनराव चव्हाण (56, दोघे रा. भोळी, ता. खंडाळा) अशी ठार झालेल्या चुलत्या-पुतण्याची नावे आहेत. हे दोघे शिरवळ येथील नातेवाईकाच्या साखरपुडा कार्यक्रमास गेले होते.

घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. शिरवळ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, कंटेनरचालक गौरव विजय ढोरे (वय 22, रा. गडकुमली, ता. साकोली, जि. भंडारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, खंडाळा तालुक्यातील भोळी (ता. खंडाळा) येथील अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण हे दोघे शिरवळ येथील नातेवाईकाच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी मोटारसायकल (एमएच 11 सीएक्स 1165) वरून गेले होते. साखरपुडा झाल्यानंतर अमोल आणि धनंजय चव्हाण हे दोघे शिरवळहून गावी भोळीकडे येत होते. त्यावेळी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भोळी गावच्या हद्दीत असणाऱ्या एसटी बस थांब्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर (केए 51 एएच 6582) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. कंटेनरची गरज इतकी जोरात होती, की या अपघातात अमोल व धनंजय हे गंभीर जखमी झाले.या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ शिरवळ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य दाखल झाले. त्यांनी दोन्ही जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या अपघाताची रोहन चव्हाण यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनंतर कंटेनरचालक गौरव विजय ढोरे (वय 22, रा. गडकुमली, ता. साकोली, जि. भंडारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा शिरवळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.