राहुरी कारखान्यावर तनपुरेंचं वर्चस्व, 21-0 च्या फरकाने शेटेंचा धुव्वा, सुजय विखेंनी पराभवाचा वचपा काढला.

राहुरी कारखान्यावर तनपुरेंचं वर्चस्व, 21-0 च्या फरकाने शेटेंचा धुव्वा, सुजय विखेंनी पराभवाचा वचपा काढलाअहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे कारखान्यातील प्रतिष्ठेच्या बनवलेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. तनपुरे गटाच्या जनसेवा पॅनलने शेतकरी विकास मंडळाचा 21-0 च्या फरकाने सुपडा साफ करत डॉक्टर तनपुरे कारखान्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.अरुणराव तनपुरे यांच्या विरोधातील राजू शेटे यांच्या पॅनेलचा पराभव झाला, मात्र भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी हिशोब चुकता केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. तनपुरे गटाच्या पॅनलच्या मोठ्या विजयात सुजय विखेंची तटस्थ भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे.मागील वर्षी लोकसभा निवडणुकी वेळी सुजय विखेंच्या विरोधात काम करत राजू शेटे यांनी खासदार निलेश लंके यांच्यासाठी उघडपणे काम केले होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी बदला घेण्याची जणू मोहीमच सुरू केली. विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, पारनेर येथे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अशा दिग्गजांना पराभूत करत आपल्या पराभवाचा वचपा काढला.तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत सुजय विखे यांनी तटस्थ भूमिका निभावली.

नापूर्वी सुजय विखे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घ्या असे आवाहन सभासद शेतकऱ्यांना केले होते. सुजय विखेंच्या भूमिकेमुळे राजू शेटे यांच्या पॅनलला मोठे नुकसान झाले आहे. राजू शेटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बळावर आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे गेले मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. मात्र जनसेवा पॅनेलचे नेतृत्व करणारे अरुण तनपुरे आणि माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांना यश प्राप्त झाले.राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वात जनसेवा मंडळ निवडणुकीला सामोरे गेले. शेतकरी विकास मंडळाच्या बॅनरखाली युवा नेते राजू शेटे यांनी पॅनल तयार केला. तर अमृत धूमाळ यांनी कारखाना बचाव कृती समिती स्थापन करून निवडणूक लढवली. आता या तीनही पॅनलमध्ये तनपुरेंचा पॅनल उजवा दिसला.मुळातच तनपुरे यांचा अनेक वर्ष कारखान्यावर होल्ड होता. सहकाराबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकीमध्ये तनपुरे गट सक्रिय आहे. कारखान्याच्या निवडणुकीतही गटागटात तनपुरे यांना मानणारा एक वर्ग आहे. कार्यकर्त्याची फौज आहे, ती फौज या निवडणुकीत बाहेर आलेली दिसली. याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीत उमेदवारीचा शब्द दिला असल्याने ते कार्यकर्तेही कारखाना निवडणुकीत मतदानासाठी सभासदांना मतदान केंद्रावर घेऊन येताना दिसले.या उलट राजू शेटे यांची सर्व मदार कर्डिले व विखे गटावर अवलंबून होती. यात कर्डिले गटाने मदत केल्याची चर्चा आहे. मात्र कर्डिले गटाची सहकारात ताकद मोठी नाहीच. त्यापेक्षा विखे गट बलवान आहे. मात्र त्यांनी पूर्णतः अलिप्त धोरण घेतले.तनपुरे गटातील काही उमेदवारांना विखेंची मदतही मिळाल्याची चर्चा झाली. त्यामुळे शेतकरी विकास आघाडीला ग्राउंड लेव्हलला काम करण्यासाठी निष्ठावंतांची फौज उभी करता आली नाही. विखे तथा भाजपचा दुसरा गट तनपुरे गटाला मदत करताना दिसला. युवा नेते उदयसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे प्रचारात कुठेही दिसले नाही. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी मते टाकली. ती कोणाला याचीही चर्चा झाली. अमृत धुमाळांचा लंगडा पॅनल होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.