रामानंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे.

दि.३०/०५/२०२५ रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे. सदरची बातमी मिळाताच पोनि/राजेंद्र गुंजाळ यांनी मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सो व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी  संदीप गावीत सो यांना सदरची गोपनीय बातमीची माहीती दिली. त्यावर मा. वरीष्ठांनी तात्काळ बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.त्यावरुन पोनि/राजेंद्र गुंजाळ यांनी रामानंद नगर पोस्टेचे सपोनि संदीप वाघ, सपोनि/संदीप पाटील, पोउपनि/संजय शेलार पोह/९७४ जितेंद्र राजपुत, पोह/१०७२ जितेंद्र राठोड, पोह/७४२ सुशिल चौधरी, पोह/५८० प्रविण भोसले,

चापोह प्रमोद पाटील, पोना/२९९५ रेवानंद साळुंखे, पोना/७०९ मनोज सुरवाडे, पोना ३००९ अतुल चौधरी, पोना ३०७१ विनोद सुर्यवंशी, पोशि/३३८८ रविंद्र चौधरी, पोशि/३३२३ उमेश पवार, पोशि/२२७९ अजिज शहा, पोशि/२२४६ प्रविण सुरवाडे, पोशि/३२५२ दिपक वंजारी, पोशि/१५०३ अनिल सोननी, मपोह/२६७६ आशा गायकवाड, मपोशि/२१७४ शिला नांगुर्डे अश्या अंमलदारांचे पथक तयार केले. छापाकामी आवश्यक ती तयारी करुन बातमी ठिकाणी शोध घेण्यास सुरवात केली बराच वेळ शोध घेतले नंतर राजीव गांधी नगर येथील एका निमुळत्या गल्लीत एक इसम संशयीतरित्या हालचाल करतांना आढळून आल्याने बातमी ठिकाणी छापा घालणेकामी दोन शासकीय पंचासह सापळा लावला. सदर संशयीताने पोलीस आल्याचे पाहताच पळून जाण्याचे तयारीत असतांना पोलीस पथकाने त्यास जागेवरच पकडुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने रमेश बाबासाहेब झेंडे वय-५४वर्षे रा.राजीव गांधी नगर जळगाव असे सांगितले.

व त्यास विश्वासात घेवुन नियमानुसार त्याचे घराची झडती घेतली असता, त्याचे घरातील एका प्लास्टिकचे पिशवीत हिरवे पाने, बिया काडया असलेला उग्रवासाचा अमली पदार्थ मिळुन आला सदर पदार्थाची फॉरेन्सीक पथकाकडुन तपासणी केली. तपासणीत सदर पदार्थ मानवी बुध्दीवर परीणाम करणार गुंगीकार अमली पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे वजन केले असता १.३६०० कि.ग्रॅ. एवढे असुन सुमारे १३,६००/- रु किंमतीचा गांजा छाप्यात मिळुन आल्याने मुददेमाल जागेवरच सिलबंद करण्यात आला आहे.करीता सदर आरोपी नामे रमेश बाबासाहेब झेंडे वय-५४वर्षे रा.राजीव गांधी नगर जळगाव यास मुददेमालासह ताब्यात घेवुन रामानंद नगर पोस्टेस CCTNS गुरनं २०७/२०२५ NDPS कायदा १९८५ कलम ८(c) २० (b)ii२२ (B) प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास मा. वरीष्ठांचे व पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.