यवतमाळ: वणीजवळ सापडले दोन हजारो वर्षांपूर्वीचे गाव; संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा.

सातवाहन आणि वाकाटक यांच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळात आजच्या वणी शहराचे प्राचीन मूळ गाव हे ‘नीरगुडा’ होते. याच गावावरून नदीला ‘निर्गुडा’ हे नाव पडले. पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन वणी झाले होते. परंतु, हे गाव नेमके कुठे होते याबाबत स्पष्टता नव्हती. वणीचा इतिहास लिहिण्यासाठी प्रा. सुरेश चोपणे यांनी तालुक्याच्या संशोधनाचे कार्य हाती घेतल्यानंतर नीरगुडा हे गाव वणीजवळच दक्षिणेला आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे.प्रा. सुरेश चोपणे यांना मे महिन्यात त्यांना वणीच्या दक्षिणेला नदीच्या किनारी ‘निरगुडा’ हे गाव सापडले. ‘नीर’ म्हणजे पाणी आणि ‘गुडा’ म्हणजे गाव; याच ‘नीरगुडा’ गावावरून नदीला ‘निर्गुडा’ हे नाव पडले.

हे गाव खूप प्राचीन असल्याने याचे लेखी पुरावे आढळलेले नाहीत. आज या ठिकाणी खळबळा मोहल्ला (रंगनाथनगर) वस्ती झाल्यामुळे येथील सर्व पुरावे नष्ट झाले आहेत.वणीचे मूळ गाव हे याच नीरगुडा गावात आहे. जेव्हा या परिसरात हिंदू राजांच्या काळात व्यापार केंद्र झाले. तेव्हा येथे कापड आणि किराणा दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू झाली. सभोवतालच्या गावांतून येथे लोक किराणा माल घ्यायला येत असे. किराणा दुकानदारांना ‘वाणी’ असे म्हटले जाते. याच ‘वाणी’ शब्दावरून या मोठ्या वस्तीला वान्यांची वस्ती असे म्हटले जात असे. या ‘वाणी’ शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘वणी’ हे नाव पडले. मुस्लिम लोक ‘वन,’ ‘वून’ असे संबोधत होते. ब्रिटिश राज्यात इंग्रजांनी मुस्लिम लोकांच्या उच्चारावरून कागदोपत्री वून (WUN) हे नाव लिहिण्यास सुरुवात केली.

वणीचे मूळ गाव हे याच नीरगुडा गावात आहे. जेव्हा या परिसरात हिंदू राजांच्या काळात व्यापार केंद्र झाले. तेव्हा येथे कापड आणि किराणा दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू झाली. सभोवतालच्या गावातून येथे लोक किराणा माल घ्यायला येत असे. किराणा दुकानदारांना ‘वाणी’ असे म्हटले जाते. याच ‘वाणी’ शब्दावरून या मोठ्या वस्तीला वान्यांची वस्ती असे म्हटले जात असे. या ‘वाणी’ शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘वणी’ हे नाव पडले. मुस्लिम लोक ‘वन’, ‘वून’ असे संबोधत होते. ब्रिटिश राज्यात इंग्रजांनी मुस्लिम लोकांच्या उच्चारावरून कागदोपत्री वून (WUN) हे नाव लिहिण्यास सुरुवात केली. परंतु, येथील रहिवाशांनी ‘वनी’ हे नाव बदलले नाही. एकूणच सर्व अभ्यासाअंती पूर्वीचे ‘नीरगुडा’ हेच वणीचे मूळ गाव असून नदीला याच गावावरून येथील नदीला ‘निर्गुडा’ नाव पडले, अशी माहिती संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.