मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, जालन्यातील दुर्दैवी घटना.

मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना जालना येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.जालन्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. जालन्याच्या अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे ही घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर बाबुराव खराद (वय २० वर्ष) असं मयत तरुणाच नाव आहे. अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील दोन तरुण नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी ज्ञानेश्वर खराद या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात बुडाला. आपला मित्र पाण्यात बुडल्याच समजताच त्याच्या मित्राने याची माहिती गावातील अन्य लोकांना दिली. यावेळी ग्रामस्थांनी गोदावरी नदी पात्राकडे धाव घेत बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू केला.

तब्बल दोन तासांच्या शोध कार्यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आला. ज्ञानेश्वरच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खराद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डोमलगाव गावावर शोककळा पसरली आहे.गोदा पात्रात वाळू माफियांचा हैदोस माजवला आहे हजारो गाड्या अवैध वाळू उपसा महसूल विभाग मात्र अध्याप झोपेचे सोंग घेत आहे . वाळू माफिया ने आतापर्यंत तहसीलदार नायब तहसीलदार महसूल कर्मचारी पोलीस कर्मचारी अशा अनेकांवर गाड्या घातल्याचे प्रकार समोर केलेले आहे मात्र याचा बोध सरकार अजूनही घेत नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना देखील त्रास झालेले आहेत.

त्यामुळे गोदा पात्र सध्या मोठे मोठे खड्डे तयार झाले आहेत सध्या नदीला पाणी असल्याने ते खड्डे दिसेना वाळू उपसा करण्यासाठी नदीत क्रेन सोडली जाते ती क्रेन दोरीने बांधलेले असे तेव्हा महसूल चे पचत कारवाई शेतीची तवा वाळू वळूया क्रेन ओढून नेता नाही दूर कापून टाकत यामुळे या दोराचेही जाळे तयार झालेले आहेत, यातच हा तरुण गुंतला होता की काय अशी शंका देखील आता निर्माण होत आहे त्यामुळे गावकऱ्याकडून देखील अवैध वाळू उपचार कारवाई करावी अशी मागणी होत आहे मात्र अवैध वाळू वाहतूक करणारे कोणालाही घाबरत नाही दमदाट्या करत असतात हे नेहमीच जालना जिल्ह्यातील उदाहरण झालेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अवैध वाळू उपसा विरुद्ध महसूल विभाग काही कार्य करेल का असाच प्रश्न आता सर्वसामान्य समोर उभा राहत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.