सरपंचबाईंचा कौतुकास्पद निर्णय! पाल्याचा मराठी शाळेत प्रवेश केल्यास वर्षभराची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ.

बुलढाण्यातील भडगाव मायंबा या गावी जिल्हा परिषदेची शाळा कमी पटसंख्येमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे, शाळा वाचवण्यासाठी सरपंचांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आज शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत किंबहुना गाव खेड्यापर्यंत आपला मुलगा व मुलगी ही चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला पाहिजे याकरता आई-वडील धडपडत असतात .आणि यामुळे गावातील व शहरातील जिल्हा परिषद ,नगर परिषद, मराठी माध्यमिक शाळा या ओस पडत आहे. आज शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत किंबहुना गाव खेड्यापर्यंत आपला मुलगा व मुलगी ही चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला पाहिजे याकरता आई-वडील धडपडत असतात. यामुळे गावातील आणि शहरातील जिल्हा परिषद, नगर परिषद, मराठी माध्यमिक शाळा या ओस पडत आहे.

बुलढाण्यातील चिखली तालुका घाटावरचा हा एक महत्त्वाचा तालुका म्हणून याची ओळख याच तालुक्यात भडगाव मायंबा या गावांमध्ये जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा होती. या शाळेत पटसंख्या ही सामान्यता समाधानकारक म्हणून गणल्या जात होती. मात्र जस जसा विद्यार्थ्यांचा कल हा इंग्रजी माध्यमिक शाळांकडे वाढू लागला तस तसा जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या खूप कमी झाली परिणामी शासनाला तीन वर्ग कमी करावे लागले.सध्या याच गावामध्ये चौथीपर्यंतच जिल्हा परिषदेतील शाळा आहे. त्यातही पटसंख्या ही केवळ 29 शेवटची घटका मोजत असल्यामुळे गावातून मराठी शाळा बंद पडू नये

यासाठी सरपंच अनुसया खडके आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेत जे पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश देतील त्यांना वर्षभराची घरपट्टी आणि पाणी कर शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक ठराव ग्राम पंचायतीने सर्वांमध्ये मंजूर केला आहे.ग्रामपंचायत ने तर निर्णय घेतला. मात्र याला जोड हवी ती गावातील पालक वर्गांची. मात्र ते देखील आता याला उत्तम प्रतिसाद देत आहे .अशा प्रकारचा निर्णय घेणारी भडगाव ही पहिलीच ग्रामपंचायत म्हणावे लागेल. या ठरावामुळे निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळा टिकण्यासाठी मदत होणार तर आहेच. मात्र राज्यातल्या इतर ग्रामपंचायतीने देखील असाच पुढाकार घेऊन पटसंख्या वाढवण्यासाठी निर्णय घेणे गरजेचे आहे. सरकारी शाळा संदर्भात जनजागृती झाल्यास निश्चितच या शाळा टिकतील अन्यथा बहुतांश सरकारी शाळा नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.