स्लॅब कोसळून विरारमध्ये ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू, ११ दिवसांतील तिसरी दुर्घटना.

वसई विरार शहरातील मागील ११ दिवसांतील स्लॅब कोसळण्याची ही तिसरी घटना असून यात आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.विरारमध्ये एका इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून गुरुवारी मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. अलफिया अब्बास मनासवाला (५४) असे मृत महिलेचे नाव आहे. वसई विरार शहरातील मागील ११ दिवसांतील स्लॅब कोसळण्याची ही तिसरी घटना असून यात आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेट येथे मर्चेन अपार्टमेंट या इमारतीच्या सी विंगमधील दुसऱ्या मजल्यावरील ११ नंबरच्या फ्लॅटमध्ये मनासवाला कुटुंब राहते. घरातील सर्व जण झोपेत असताना गुरुवारी मध्यरात्री अचानक स्लॅब कोसळला. यात अलफिया या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शुक्रवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद झाली आहे.२१ मे २०२५ –नालासोपारा, आचोळे येथील सिमरन साई या चारमजली इमारतीच्या खोली क्र.४०४चा स्लॅब कोसळला. अडलेल्या दोघांची अग्निशमन दलाने सुटका केली. २६ मे २०२५ -विरार, गोपचर पाडा येथील पूजा अपार्टमेटच्या क्र. ३३५ या सदनिकेचा स्लॅब कोसळून लक्ष्मी सिंग (२७) या महिलेचा मृत्यू झाला. ३० मे २०२५ -विरार- एमबी इस्टेट येथील मर्चेन इमारतीमधील ११ क्रमांकाच्या खोलीचा स्लॅब कोसळून अलफिया मनासवाला यांचे मृत्यू झाला.वसईत ४२ वर्षे वयाच्या करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मागील करोना लाटेनंतरचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत दोन करोना रुग्ण आढळून आले आहेत. वसई-विरारमध्ये मागील आठवड्यात एक करोना रुग्ण आढळला होता. त्याला उपचारानंतर घरी पाठवले होते. त्यानंतर वसईच्या नायगाव येथील ४२ वर्षीय व्यक्तीला न्युमोनिया आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईच्या रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचणीत त्याला करोना झाल्याचे आढळून आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. हा रुग्ण वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील नव्हता. त्याला न्युमोनिया, श्वसनास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.

 

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.