ईशान्य भारतात पर्जन्यसंकट; अरुणाचलमध्ये ९, तर आसाममध्ये ५ जणांचा मृत्यू, भूस्खलनाचीही आपत्ती.

अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाना-सेप्पा भागात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनात वाहन वाहून गेल्याने शुक्रवारी दोन कुटुंबांतील सात जणांचा मृत्यू झाला.ईशान्य भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अरुणाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे नऊ जणांचा जणांचा, तर आसाममध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. गेल्या दोन दिवसांत पावसामुळे गेलेल्या बळींची संख्या ३० झाली आहे.अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाना-सेप्पा भागात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनात वाहन वाहून गेल्याने शुक्रवारी दोन कुटुंबांतील सात जणांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात त्यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याचे पूर्व कामेंग पोलिस अधीक्षक कामदान सिकोम यांनी सांगितले. यात बळी गेलेले सर्व जण हे बाना येथील किटचांग जिल्ह्यातील रहिवासी होते, असेही ते म्हणाले.या ठिकाणी बचावकार्य लगेच सुरू करण्यात आले. परंतु, मुसळधार पाऊस, सातत्याने होणारे भूस्खलन आणि रात्रभर अतिशय कमी असणारी दृश्यमानता यामुळे त्यात सतत व्यत्यय येत होता.

अशा अडथळ्यांमध्येही पोलिस आणि बचाव पथकांकडून सातत्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते.दरम्यान, गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसात आसाममधील कामरूप (मेट्रो) जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलांचाही समावेश आहे, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिली. एएसडीएमएने शनिवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पुरामुळे आसाममधील कामरूप, कामरूप (मेट्रो) आणि काचर हे तीन जिल्ह्यांतील सुमारे १० हजार १५० लोक बाधित झाले आहेत. गुवाहाटी शहरातही भूस्खलनाच्या तीन घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे. सातत्याने सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतील रस्त्यांवर पाणी साचून राहू शकते.

वाहतूक संथगतीने होऊ शकते. यामुळे दुर्घटनाच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी सिक्कीममधील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. येथील मांगन, घ्यालशिंग आणि सोरेंग जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि येथील तिस्ता नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता पूर आणि भूस्खलनाचा धोका संभवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.संततधार पावसामुळे जम्मू-काश्मीरमधील जनजीवनावर शनिवारी विपरीत परिणाम झाला. बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे येथील खिंडींमधील मार्ग बंद झाले. विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे प्रशासनाने राजौरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना सुट्टी दिली. येथील बांदिपुरा, कुपवाडा जिल्ह्यात रस्ते पावसामुळे बंद करण्यात आले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.