“सामाजिक न्यायाची समता या पोल्ट्री वाल्याला काय कळणार, अजित पवारांचा किंगमेकर शरद पवारच”.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवार सत्तेत सहभागी होऊनही सामाजिक न्याय योजनांना निधी देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.अजित पवार कोणत्याही पक्षाची सत्ता आली की, त्या सरकारमध्ये सामील होतात, मात्र सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत केली. अजित पवारांच्या एका कारखान्याची उलाढाल आहे. तेवढाही निधी महामंडळाला मिळत नाही म्हणत हाकेंनी दादांवर घणाघात केला. लक्ष्मण हाके यांनी अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांना देखील आव्हान दिले. अजित पवार यांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो, पण आज मी बारामतीत आलो आहे..! मला रोखून दाखवा असे आव्हान हाके यांनी दिले.

अजित पवार केवळ आर्थिक नियोजन करतात. सामाजिक न्यायाची समता या पोल्ट्री वाल्याला काय कळणार? कायद्याने बंधन असताना 650 कोटी SC, ST समाजाचा निधी वळवला गेला. महाज्योतीला का पैसे दिले जात नाहीत? सारथीला एवढा निधी कसा दिला जातो? भटक्या विमुक्त महामंडळाला 50 कोटी अपेक्षित होता. पण दिले नाहीत. केवळ सत्तेतून पैसे कमवायचे आणि निवडणूक जिकायची एवढंच यांचे सूत्र आहे. अजित पवारांनी अर्थ खात्यावर नैतिकता दाखवू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.अजित दादांच्या कारखान्याचा जेवढा टर्नओव्हर आहे.

तेवढा आमच्या ओबीसींच्या महामंडळाचा निधी देखील तेवढा नाही. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. जर राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 1% च्या वर निधी दिला असेल तर मी माझे आरोप मागे घेतो, असेही हाके यावेळी म्हणाले.तुमचे कारखाने बंद पडले तर लगेच निधी मिळतो मग ओबीसींना वेगळा न्याय का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यावेळी अजित पवार सत्तेत असतात. त्यामुळे अजित पवारांचा किंगमेकर शरद पवारच आहेत. गोरगरिबांच्या डोक्यावर जे मिरे वाटतात आम्ही त्यांनाच बोलणार, अशा शब्दात हाके यांनी टीका केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.