हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी बांगलादेशा बरोबरचे सर्व क्रिकेट सामने तात्काळ रद्द करा !

हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी बांगलादेशा बरोबरचे सर्व क्रिकेट सामने तात्काळ रद्द करा !

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर  जळगाव : बांगलादेशासोबत भारताचे क्रिकेटचे दोन कसोटी सामने आयोजित करण्यात आले असून त्यातील पहिला सामना चेन्नई येथे १९ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाला आहे, तर दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर २०२४ ला कानपूरमध्ये होणार आहे, अशी माहिती वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र यांतील बातम्यांमधून समोर आली आहे. ही अत्यंत चीड आणणारी बाब आहे. क्रिकेट खेळणे म्हणजे ‘रोम जळत असतांना नीरो फिडल वाजवत होता’, असा हा प्रकार आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार अद्यापही चालू आहेत. तेथील शेकडो हिंदूंच्या चिता अद्याप शांत झालेल्या नसतांना अशा प्रकारचे क्रिकेटचे सामने आयोजित करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे, त्यामुळे बीसीसीआईने बांगलादेशाबरोबरचे सर्व क्रिकेट सामने तात्काळ रद्द करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हातात फलक धरून शिवतीर्थ, कोर्ट चौकात निदर्शने करण्यात आली. आंदोलनानंतर या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मा. पंतप्रधान, मा केंद्रीय क्रीडामंत्री, मा. परराष्ट्रमंत्री, तसेच बीसीसीआईचे अध्यक्ष यांना पाठवण्यात आले.

हातात धरलेल्या फलकांवर

१ . बांगलादेशी हिंदूंच्या वेदना बीसीसीआयला दिसत नाहीत का ???,

२ .क्रिकेट श्रोत्यांनो लक्षात घ्या,  धर्मदोही – राष्ट्रद्रोही बीसीसीआयचा धिक्कार करा !!,

३ . बीसीसीआयने बांगलादेशशी क्रिकेटचे सामने खेळवणे म्हणजे, 100 कोटी हिंदूंच्या भावनांना लाथ मारणे  !!,

४ . For BCCI… #Black_Lives_matter but #Hindu_lives_DON’T_matter,

५ . SHAME on you BCCI !!,

६ . बांगलादेश सोबत क्रिकेटला समर्थन देणे म्हणजे तेथील निष्पाप हिंदूंचा विश्वासघात करणे !!

या प्रकारच्या घोषणा लिहिल्यात आलेल्या होत्या.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द