पलूस नगरपरिषदेने चक्क गटारीचे पाणी गटारी मधेच तुंबवले : शिक्षक कॉलनी मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

पलूस नगरपरिषदेने चक्क गटारीचे पाणी गटारी मधेच तुंबवले : शिक्षक कॉलनी मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पलूस येथील शिक्षक कॉलनी येथे नवीन गटार बांधली आहे. सदर गटारीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. गटार बांधकाम करताना पलूस नगरपरिषद मधील बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी कोणतेही स्थळ पाहणी केली नाही. उताराचा भाग म्हणून सदर गटारीचे पाणी हे स्थानिक शेतकरी यांच्या शेतीमध्ये सोडले होते. सदर शेतीमध्ये सोडलेल्या गटारीचे पाण्यामुळे शेतकऱ्याचे ३ एकर चे नुकसान होत होते. त्यामूळे शेतकऱ्यांनी सदर गटारीचे पाणी शेतात सोडण्यास विरोध केला.

पलूस नगरपरिषद मधील बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सदर गटारीचे पाणी योग्य ठिकाणी न सोडताच त्यांनी सदर गटारी मध्येच पाणी तुंबवले आहे. त्यामूळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खुप दुर्गंधी पसरली आहे.त्यामूळे शिक्षक कॉलनी मधील राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉलनी मधील लहान बाळे हे आजारी पडले आहेत. तरी नगरपरिषद मधील बांधकाम विभागाचे अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी तातडीने याबाबत उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करणार असा इशारा मनसेचे पलूस तालुका अध्यक्ष सागर सुतार यांनी यावेळी दिला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.