श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. देवयानी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्षपदी हेमलता पाटील यांची निवड

श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव निमित्त संस्थापक अध्यक्ष सुनील (बंटी) भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून त्यात या वर्षीची महिला मंडळाची कार्यकारिणी व समित्यांची स्थापना करण्यात आली. श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनचा दुर्गोत्सव मागील 12 वर्षांपासून सामाजिक जनजागृतीच्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते त्यात मागील वर्षी रेणुका मातेचे माहूर गडाची प्रतिकृती देखाव्यासाठी गौरविण्यात आले होते. तसेच, मंडळातर्फे दुर्गोत्सव मध्ये अत्यंत प्रिय असलेला गरबा, दांडिया आणि दशमा दरवर्षी आयोजित केला जातो तसेच विविध भागांतून निर्माल्य संकलनाचे काम करण्यात येते. त्याचप्रमाणे आतापर्यंत विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक देखावे सादर केले असून, त्यातून समाजप्रबोधनाचे कार्य केले जाते.









