मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली कार्यवाही

_मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली कार्यवाही

जळगावच्या ज्येष्ठांची वारी,  जातेय आयोध्या नगरी !!

 ▪️ 30 सप्टेंबर रोजी जळगाव वरून 9.15 वाजता निघणार

जळगाव – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्गत जळगाव जिल्ह्यातून निवड झालेल्या यात्रेकरूंची अयोध्येसाठी जळगाव येथून 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9.25 वाजता पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.  महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.

सदर योजनेतंर्गत जळगाव जिल्हयातील इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठया प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. सदर अर्जांची छाननी करुन 796 लाभार्थी व 12 सहायक यांची  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना समन्वय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत निवड करून शासनास शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जळगाव येथून तीर्थदर्शनासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेला परवानगी मिळाली असून दि.30.9.2024 रोजी,सकाळी 9.15 वाजता जळगाव येथून श्रीराम मंदिर अयोध्या येथे तीर्थदर्शनासाठी रवाना होणार आहे.तीर्थयात्रेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, सहायक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय जळगाव व जिल्हयातील सर्व तालुक्यांचे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व नगरपालिका/नगरपरिषद कार्यालये येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.