श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. देवयानी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्षपदी हेमलता पाटील यांची निवड.

श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. देवयानी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्षपदी हेमलता पाटील यांची निवड

श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव निमित्त संस्थापक अध्यक्ष सुनील (बंटी) भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून त्यात या वर्षीची महिला मंडळाची कार्यकारिणी व समित्यांची स्थापना करण्यात आली. श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनचा दुर्गोत्सव मागील 12 वर्षांपासून सामाजिक जनजागृतीच्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते त्यात मागील वर्षी रेणुका मातेचे माहूर गडाची प्रतिकृती देखाव्यासाठी गौरविण्यात आले होते. तसेच, मंडळातर्फे दुर्गोत्सव मध्ये अत्यंत प्रिय असलेला गरबा, दांडिया आणि दशमा दरवर्षी आयोजित केला जातो तसेच विविध भागांतून निर्माल्य संकलनाचे काम करण्यात येते. त्याचप्रमाणे आतापर्यंत विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक देखावे सादर केले असून, त्यातून समाजप्रबोधनाचे कार्य केले जाते.

यावर्षी केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती अती प्राचीन कालीन देवाधी देव महादेव भगवानचे केदारनाथ मंदिर पवित्र हिंदू धर्माची वास्तूकला उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या मंदिराची प्रतिकृती श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड येथे उभारण्यात येणार केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. मंदिराची प्रतिकृती श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड येथे उभारण्यात येत असून सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.

तसेच झालेल्या बैठकीत श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे श्री अष्टभुजा दुर्गोत्सव महिला मंडळ स्थापन करण्यात आले मंडळाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: सल्लागार समिती- मनीषा खडके, नीलिमा वारके, प्रणाली चौधरी.

अध्यक्ष- देवयानी मुविकोराज कोल्हे
उपाध्यक्ष- हेमलता मयूर पाटील
कोशाध्यक्ष- रोशनी अक्षय खडके
कार्याध्यक्ष- करिश्मा सूरज बोरोले,
सह कार्याध्यक्ष- नेहा संजय पाटील, मीनल निलेश कोल्हे सदस्यांमध्ये सारिका अत्तरदे, कीर्ती पाटील, गौरी खडके, श्रद्धा आत्तरदे, दिपा कोल्हे, दिक्षा , विशाखा खडके, दिपाली चौधरी, श्रद्धा तळले, गुंजन खडके, हर्शिता खडके, श्वेता सरोदे. गरबा दांडिया आणि दशमा नियोजन समिती मध्ये प्रांजल खडके, शुभांगी पाटील, मोनाली जयस्वाल, मिताली खडके, सोनिया बऱ्हाटे, पायल खडके, स्नेहा खडके, उमा पारधी, योगिता खडके, भाग्यश्री चौधरी, रुपाली बोंडे, ज्योती मराठे. शांतता व नियोजन समिती – भारती चौधरी, सुनीता सरोदे, मीनाक्षी पाटील, सुनंदा महाजन, रिटा खडके, शिल्पा खडके, दिपाली पाटील, आशा खडके, वर्षा झोपे, वर्षा पाटील, लक्ष्मी खडके, वर्षा खडसे सदस्यांचाही यात सहभाग असणार आहे असे श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील (बंटी) भारंबे यांनी मंजुरी दिली. यावेळी संस्थेचे सचिव मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्ष दिलीप महाजन, निलेश कोल्हे, विशाल खडके, रवींद्र खडके, योगेश खडके, स्वप्निल जयस्वाल बैठकीस उपस्थित होते.

तसेच यावर्षी केदारनाथ देवस्थानाची प्रतिकृती साकारण्यात येणार असून जळगाव शहरातील सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बापरे! हातोड्यानं मालकाचं डोकं ठेचलं, मग बॉडीचे तुकडे; सालगड्याची क्रूरता, सोलापूर हादरलं

    बापरे! हातोड्यानं मालकाचं डोकं ठेचलं, मग बॉडीचे तुकडे; सालगड्याची क्रूरता, सोलापूर हादरलं

    पुढच्या गाडीचा पार्ट उडाला, बोनेटवर आदळून एअरबॅग्ज उघडल्या; फटक्याने वाशीत चिमुकल्याचा मृत्यू

    पुढच्या गाडीचा पार्ट उडाला, बोनेटवर आदळून एअरबॅग्ज उघडल्या; फटक्याने वाशीत चिमुकल्याचा मृत्यू

    जयपूर-अजमेर महामार्गावर चार दिवसानंतर पुन्हा मोठा अपघात, 10 जखमी, मदतकार्य सुरू

    जयपूर-अजमेर महामार्गावर चार दिवसानंतर पुन्हा मोठा अपघात, 10 जखमी, मदतकार्य सुरू

    तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख करु; तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी, पत्रासोबत शंभराची नोट,

    तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख करु; तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी, पत्रासोबत शंभराची नोट,

    गायक शान राहत असलेल्या इमारतीमध्ये भीषण आग; वांद्रे परिसरातील घटनेचा Video आला समोर

    गायक शान राहत असलेल्या इमारतीमध्ये भीषण आग; वांद्रे परिसरातील घटनेचा Video आला समोर

    वर्षभरात ३३५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला; यवतमाळ जिल्ह्यातील वास्तव, हिवाळी अधिवेशनात चर्चाच नाही

    वर्षभरात ३३५ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला; यवतमाळ जिल्ह्यातील वास्तव, हिवाळी अधिवेशनात चर्चाच नाही