भारतीय जनता पक्षाने राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे अखेर जाहीर केली आहेत. याआधी पक्षाकडून 58 जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.भारतीय जनता पक्षाने राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे अखेर जाहीर केली आहेत. याआधी पक्षाकडून 58 जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र उर्वरित 22 जिल्ह्यांच्या संदर्भात अंतर्गत मतभेद आणि स्थानिक स्तरावरील राजकीय गणितामुळे ही यादी काही काळासाठी रोखून धरली गेली होती. सध्या काही जिल्ह्यांमध्ये चर्चा पूर्ण झाल्यानंतर आणि स्थानिक व केंद्रीय नेत्यांमध्ये समन्वय साधल्यानंतर या उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक सिंह, सह-संघटनमंत्री शिवप्रकाश आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून जिल्हाध्यक्ष निवडीसंबंधी चर्चा केली होती. यानंतर आता भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात नाशिक, नगर, बीडसह प्रमुख जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
‘या’ 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा
-
पालघर – भरत राजपूत
-
वसई विरार – प्रज्ञा पाटील
-
अहिल्यानगर शहर – अनिल मोहिते
-
नाशिक शहर – सुनील केदार
-
नाशिक दक्षिण – सुनील बच्छाव
-
नाशिक उत्तर – यतीन कदम
-
पुणे दक्षिण (बारामती) – शेखर वढणे
-
कोल्हापूर शहर – विजय जाधव
-
गडचिरोली – रमेश बारसागडे
-
चंद्रपुर शहर – सुभाष कासमगुट्टवार
-
चंद्रपूर ग्रामीण – हरिष शर्मा
-
वर्धा – संजय गाते
-
परभणी ग्रामीण – सुरेश भुबंरे
-
छत्रपती सांभाजीनगर शहर – किशोर शितोळे
-
लातूर शहर – अजित पाटील कव्हेकर
-
लातूर ग्रामीण – बसवराज पाटील
-
नांदेड उत्तर – अॅड. किशोर देशमुख
-
नांदेड दक्षिण – संतुकराव हंबर्डे
-
बीड – शंकर देशमुख
-
उत्तर पश्चिम मुंबई – ज्ञानमूर्ती शर्मा
-
दक्षिण मध्य मुंबई – निरज उभारे
-
दक्षिण मुंबई – श्रीमती. शलाका साळवी
याआधी जाहीर केलेली यादी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपकडून 58 जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. ती पुढीलप्रमाणे…
-
सिंधुदुर्ग – प्रभाकर सावंत
-
रत्नागिरी उत्तर – सतीश मोरे
-
रत्नागिरी दक्षिण – राजेश सावंत
-
रायगड उत्तर – अविनाश कोळी
-
रायगड दक्षिण – धैर्यशील पाटील
-
ठाणे शहर – संदीप लेले
-
ठाणे ग्रामीण – जितेंद्र डाके
-
भिवंडी – रवीकांत सावंत
-
मीरा-भाईंदर – दिलीप जैन
-
नवी मुंबई – डॉ. राजेश पाटील
-
कल्याण – नंदू परब
-
उल्हासनगर – राजेश वधारिया
-
पुणे शहर – धीरज घाटे
-
पुणे उत्तर (मावळ) – प्रदीप कंद
-
पिंपरी चिंचवड शहर – शत्रुघ्न काटे
-
सोलापूर शहर – रोहिणी तडवळकर
-
सोलापूर पूर्व – शशिकांत चव्हाण
-
सोलापूर पश्चिम – चेतनसिंग केदार
-
सातारा – अतुल भोसले
-
कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) – राजवर्धन निंबाळकर
-
कोल्हापूर पश्चिम (करवीर) – नाथाजी पाटील
-
सांगली शहर – प्रकाश ढंग
-
सांगली ग्रामीण – सम्राट महाडिक
-
नंदुरबार – निलेश माळी
-
धुळे शहर – गजेंद्र अंपाळकर
-
धुळे ग्रामीण – बापू खलाने
-
मालेगाव – निलेश कचवे
-
जळगाव शहर – दीपक सुयवंशी
-
जळगाव पूर्व – चंद्रकांत बाविस्कर
-
जळगाव पश्चिम – राध्येश्याम चौधरी
-
अहिल्यानगर उत्तर – नितीन दिनकर
-
अहिल्यानगर दक्षिण – दिलीप भालसिंग
-
नांदेड महानगर – अमर राजूरकर
-
परभणी महानगर – शिवाजी भरोसे
-
हिंगोली – गजानन घुगे
-
जालना महानगर – भास्करराव दानवे
-
जालना ग्रामीण – नारायण कुचे
-
छत्रपती संभाजीनगर उत्तर – सुभाष शिरसाठ
-
छत्रपती संभाजीनगर पश्चिम – संजय खंबायते
-
धाराशिव – दत्ता कुलकर्णी
-
बुलढाणा – विजयराज शिंदे
-
खामगाव – सचिन देशमुख
-
अकोला महानगर – जयवंतराव मसणे
-
अकोला ग्रामीण – संतोष शिवारकर
-
वाशिम – पुरुषोत्तम चितलांगे
-
अमरावती शहर – डॉ. नितीन धांडे
-
अमरावती ग्रामीण (मोर्शी) – रवीराज देशमुख
-
यवतमाळ – प्रफुल्ल चव्हाण
-
पुसद – डॉ. आरती फुफाटे
-
मेळघाट – प्रभुदास भिलावेकर
-
नागपूर महानगर – दयाशंकर तिवारी
-
नागपूर ग्रामीण (रामटेक) – अनंतराव राऊत
-
नागपूर ग्रामीण (काटोल) – मनोहर कुंभारे
-
भंडारा – आशु गोंडाने
-
गोंदिया – सिता रहांगडाले
-
उत्तर मुंबई – दीपक बाळा तावडे
-
उत्तर पूर्व मुंबई – दीपक दळवी
-
उत्तर मध्य मुंबई – विरेंद्र म्हात्रे











