हा संतापजनक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला असून पीडितेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू, सासरे आणि नणंदेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच राज्यभरातून हुंडा, घरगुती हिंसाचार, छळवणुकीचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर, 5 लाखांचा हुंडा द्या,अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा. आमचे नक्षल्यांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू, अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला लग्नाच्या अवघ्या 60 दिवसात अंगावरील कपड्यांसह घरातून हाकलून लावल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा संतापजनक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला असून पीडितेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू, सासरे आणि नणंदेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.











