अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्यूमिनिअमवरील आयातीवर लादण्यात आलेलं आयात शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या रिपोर्टनुसार भारताला 4.56 अब्ज डॉलर म्हणजेच 38000 कोटी रुपयांच्या धातू आणि स्टील निर्यातीवर संकट ओढावलं आहे. नेमकं काय प्रकरण?डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 मे 2025 रोजी अमेरिकेत आयात होणाऱ्या अॅल्यूमिनिअम आणि स्टीलच्या आयातीवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरुन वाढून 50 टक्के करण्यात आलं आहे. हा नवा नियम 4 जून 2025 पासून लागू होणार आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत घेतला आहे.











