पोहता येत असूनही कालव्यात बुडाले कसे? वर्षभर पत्नीच्या डोक्यात संशय, अखेर हडपसरमधील हत्येचं गूढ उकललं.

पुण्यात वर्षभरापूर्वी हडपसर परिसरात एका व्यक्तीचा कालव्यात बुडून मृत्यू झाला होता. पत्नीच्या संशयावरुन केलेल्या तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचं उघडकीस आलं आहे. पत्नीच्या संशयावरुन वर्षभराने मोठ्या घटनेचा उलगडा झाला आहे.हडपसर परिसरातील उन्नतीनगर येथे एका व्यक्तीचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वर्षभरापूर्वी २०२४ मध्ये समोर आली होती. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू मानला गेला. मात्र, मृत व्यक्तीला पोहता येत असल्याने त्याच्या पत्नीने संशय व्यक्त केला होता. पत्नीच्या संशयावरुन तब्बल वर्षभराच्या चौकशीनंतर व्यक्तीचा अपघात नसून हत्या असल्याचं उघड झालं आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांच्या कसोशीनं केलेल्या तपासातून शक्य झाली असून, पार्टीतील वादातून दोघा मित्रांनी सदर व्यक्तीस कालव्यात ढकलून दिल्याचं निष्पन्न झालं आहे.हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असं आहे. तर या प्रकरणी वैभव मनोज जाधव (वय ४२, रा. साक्षी लॉन्स, कमळापूर रोड, छत्रपती संभाजीनगर) आणि त्याचा साथीदार आशिष यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र तपासात निष्पन्न झालं की, पार्टीदरम्यान वाद झाला आणि वैभव आणि आशिष या दोघांनी मिळून विनोद यांना मारहाण केल्यानंतर थेट वाहत्या पाण्यात ढकलून दिलं. कालवा भूमिगत असल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि पाण्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह वाहत जाऊन उन्नतीनगर येथे आढळून आला.या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, विनोदला पोहता येत असूनही पाण्यात बुडून मृत्यू कसा झाला, हा प्रश्न सतत पत्नीला पडत होता. तिच्या या संशयामुळे हसीना शिकलगार यांनी पुन्हा तपास सुरू केला.या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, विनोदला पोहता येत असूनही पाण्यात बुडून मृत्यू कसा झाला, हा प्रश्न सतत पत्नीला पडत होता. तिच्या या संशयामुळे हसीना शिकलगार यांनी पुन्हा तपास सुरू केला.या सर्व पुराव्यांच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी आता खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.