क्रिकेटमध्ये नवे नियम, 34 षटकांनंतर 1 चेंडू, 5 बॅकअप प्लेयर; ICCकडून ग्रीन सिग्नल, जाणून घ्या काय काय बदलणार…

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं  प्लेईंग-11 कंडिशन्समध्ये  बदल केले आहेत. सुधारित नियमांची अंमलबजावणी कसोटी क्रिकेटमध्ये जूनपासून, तर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये जुलैपासून होईल. तशा सूचना आयसीसीनं सदस्य देशांना दिल्या आहेत. प्लेईंग-11 च्या परिस्थितीत सगळ्यात मोठे बदल आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये होणार आहेत. सध्याच्या घडीला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन्ही बाजूंनी दोन नव्या चेंडूंचा वापर होतो. पण आता नव्या नियमांनुसार, एका डावात सुरुवातीची ३४ षटकं दोन्ही चेंडूंचा वापर होईल. त्यानंतर ३५ व्या षटकापासू एक चेंडू डाव संपेपर्यंत दोन्ही बाजूनं वापरला जाईल ३४ वं षटक संपल्यानंतर आणि ३५ वं षटक सुरु होण्यापूर्वी क्षेत्ररक्षण करणारा संघ दोनपैकी एका चेंडूची निवड करेल. पाऊस किंवा अन्य कारणांमुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं २५ किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा खेळ झाल्यास एकाच चेंडूचा वापर केला जाईल.

जो चेंडू ३४ व्या षटकापर्यंत वापरला जाणार नाही, तो बॅकअप म्हणून ठेवला जाईल.आता प्रत्येक संघाला सामन्यापूर्वी कन्कशन रिप्लेसमेंट म्हणून ५ बॅकअप खेळाडूंची नावं जाहीर करावी लागतील. यामध्ये १ फलंदाज, १ यष्टिरक्षक, १ वेगवान गोलंदाज, १ फिरकीपटू आणि १ अष्टपैलू खेळाडूचा समावेश असेल. बदली म्हणून आलेला खेळाडूदेखील जखमी झाला, तर मग सामनाधिकारी नवा पर्याय निवडू शकतो.

सीमारेषेवरील झेल आणि डीआरएसच्या नियमांमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. पण त्यांची माहिती नंतर दिली जाईल.नियमांमध्ये करण्यात आलेले बदल एका कार्यकारी गटाकडे पाठवण्यात येतील, असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. पण आता हाती आलेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीनं बदलांना मंजुरी दिलेली आहे. लवकरच एक कार्यकारी गट स्थापन केला जाईल. १९ वर्षांखालील विश्वचषक टी-२० स्पर्धा, ५० षटकांचे सामने हायब्रिड स्वरुपात खेळवायचे की नाही, याचा निर्णय हा गट घेईल. सिंगापूरमध्ये १७ ते २० जुलै दरम्यान होणाऱ्या वार्षिक संमेलनापूर्वी कार्यकारी गट स्थापन होईल, अशी आशा आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.