भावांनो असेच एकत्र राहा! मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर हार्दिकचं बुमराहबद्दलचं एक वाक्य पण लाख मोलाचं.

 मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव करत आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या, तर गुजरात टायटन्स 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावाच करू शकली. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा सामना आता पंजाब किंग्सशी होणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सवर मिळवलेल्या विजयानंतर खूप आनंदी होता. त्याने आपल्या संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला त्याने ‘लक्झरी’ असल्याचे म्हटले.गुजरातविरूद्धच्या एलिमिनेटरमध्ये विजय मिळवल्यानंतर हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहची प्रशंसा करताना खास कौतुक केलं.

हार्दिकने बुमराहला “तो मुंबईतील घरांच्या किंमतीसारखा आहे, तो खूप महाग आहे”, असल्याचे म्हटलं आहे. जेव्हा त्याला वाटले की सामना हातातून निसटत आहे, तेव्हा बुमराहला गोलंदाजी दिली आणि त्याने नेहमीच संघासाठी यश मिळवले, असे पांड्याने सांगितले. गुजरातविरुद्ध बुमराहने शानदार गोलंदाजी केली आणि महत्त्वाचे विकेट्स घेतले, ज्यामुळे गुजरातच्या फलंदाजीवर दबाव आला.एक वेळ अशी होती की सामना बरोबरीवर होता, विकेट फलंदाजीसाठी चांगली झाली होती, पण आम्हाला नियंत्रण ठेवायचे होते. बेअरस्टोने वेळ घेतला आणि एकदा लय मिळाल्यानंतर त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहणे सुखद होते.

आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या क्वालिफायर 2 साठी सज्ज व्हायचे आहे, असे हार्दिकने सांगितले.गुजरात टायटन्सवर विजय मिळाल्यामुळे मुंबईचा सामना आता 1 जून रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जशी होणार आहे. क्वालिफायर-2 मध्ये जिंकणारा संघ 3 जून रोजी आरसीबीविरुद्ध अंतिम सामन्यात ट्रॉफीसाठी लढेल. आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवले. यानंतर हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. बुमराहने नेहमीच टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे, असे तो म्हणाला. गुजरातवर विजय मिळवल्यामुळे आता मुंबईचा सामना पंजाब किंग्जबरोबर होणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.