अखेरच्या षटकात दोन्ही संघांना विजयाची संधी होती, पण मुंबईच्या विजयाचं रहस्य नेमकं ठरलं तरी काय, जाणून घ्या…

मुलानपूर : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंक रंगला होता. त्यामुळे हे एक षटक दोन्ही संघांसाठी निर्णयाक ठरणारं होतं. हे षटक टाकण्यासाठी रिचर्ड ग्लेसनची निवड केली होती. पण तीन चेंडूंनंतर त्याला दुखापत झाली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू अश्विनी कुमार यावेळी गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी मुंबईला जिंकवण्यासाठी मनात नेमकं काय चाललं होतं, हे त्याने सांगितलं.अखेरच्या षटकात गुजरातच्या संघाला विजयासाठी २४ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर रिचर्डने एक धाव दिली, तर दुसरा चेंडू निर्धाव ठरला.

त्यानंतर झालेल्या तिसऱ्या चेंडूवर दोन धावा आल्या, पण त्यानंतर रिचर्डला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला गोलंदाजी करता येणार नव्हती. त्यामुळे आता करायचं काय, हा प्रश्न होता. कारण जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांची षटके संपलेली होती. अश्विनी यावेळी चांगली गोलंदाजी करत होता. त्यामुळे हे तीन चेंडू टाकण्याची मोठी जबाबदारी अश्विनीवर सोपवली.अश्विनीने हे तीन चेंडू अप्रतिमपणे टाकले. अश्विनीने आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट काढली. त्यांतर दोन्ही चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही. त्यामुळे मुंबईला विजय साकारता आला. पण त्यावेळी आपल्या मनात काय सुरु होतं, हे आता अश्विनीने सांगितलं आहे.

अश्विनी यावेळी म्हणाला की, ” अखेरची तीन षटकं टाकण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर आली होती. पण त्यावेळी माझ्या मनात एकच गोष्ट सुरु होती आणि ती गोष्ट म्हणजे माझ्याकडून एकही नो बॉल पडायला नको. कारण नो बॉल पडला तर त्यामुळे दुप्पट नुकसान होते. त्यामुळे मी यावेळी काही करून नो बॉल टाकायचा नाही, हे ठरवलं होतं. ” अश्विनीने तिन्ही चेंडूवर कोणतीच चूक केली नाही आणि त्यामुळेच हा विजय मुंबईच्या संघाला मिळवता आला.अश्विनी कुमारने अखेरच्या तीन चेंडूत एकही धाव दिली नाही आणि एक बळीही मिळवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा विजय अधिक सुकर झाल्याचे पाहायला मिळाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.