बाईकवरुन दोघे क्लासला निघालेले, वाटेत काळाचा घाला; पुण्यात दोन कुटुंबातील एकुलत्या एका मुलांचा दुर्दैवी शेवट.

पुण्यात चाकण-आंबेठाण रस्त्यावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कोरेगाव खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. दोघांच्या जाण्याने कडूसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पुण्यात अपघाताची भयंकर घटना घडली आहे. चाकण – आंबेठाण रस्त्यावर दुचाकीला ट्रकने भरधाव वेगाने येत धडक दिल्याने भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.सोहम उल्हास कडूसकर (वय १७) आणि सुजय दिलीप कडूसकर (वय १७) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. या प्रकरणी ट्रक चालक गणेश मायकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. या अपघाताने कोरेगाव खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोहम आणि सुजय हे दोघे कोरेगाव खुर्द या त्यांच्या गावातून शुक्रवारी सकाळी चाकण येथे एमएससीआयटीच्या क्लासला चालले होते. त्याचवेळी आंबेठाण बाजूकडून येणाऱ्या अवजड ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भरधाव धडकेने दोघेही रस्त्यावर पडले. त्यात त्यांना गंभीर मार लागल्याने दोघांचाही जागीच घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच कोरेगाव खुर्द आणि स्थानिक परिसरातील अनेक तरुण, नातेवाईक यांनी चाकण ग्रामीण रुग्णालयात दोघांना दाखल केलं.

मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.एकाच गावातील दोन तरुण मित्रांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने कडूसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुजय आणि सोहम हे दोघेही त्यांच्या कुटुंबात एकुलते एक होते. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून गावात शोककळा पसरली आहे.सोहम आणि सुजय हे दोघेही नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाले होते. भविष्यात काही तरी मोठं करायची अशी त्यांची स्वप्न होती. दोघांनी दहावीची परीक्षा झाल्यानंतर एमएससीआयटीचा कॉम्पुटर कोर्स लावला होता. मात्र त्यांनी उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा अंत्यत दुर्देवी शेवट झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.