करोनाचा वाढता फैलाव, राज्यातील रुग्णसंख्येनं चिंतेत भर; ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या किती वर?

भारतात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 30 मे 2025 च्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,710 वर पोहोचली आहे.देशात सर्वाधिक सक्रिय कोविड-१ चे रुग्ण केरळमध्ये आहेत. तिथे 1,147 लोकांना लागण झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 467, दिल्लीत 294 आणि गुजरातमध्ये 223 रुग्ण आहेत.महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोविड-19 चे 84 नवीन रुग्ण आढळले आहेत. 84 रुग्णांपैकी 32 रुग्ण मुंबईत आढळले ठाणे महापालिका क्षेत्रात 14 रुग्ण, ठाणे ग्रामीण 2 रुग्ण, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत 1, रायगडमध्ये 2 रुग्ण, नाशकात 1 रुग्ण, 19रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात साताऱ्यात दोन रुग्ण, कोल्हापूरात 2 रुग्ण, सांगलीत 3 रुग्ण इत्यादींचा समावेश आहे.

त्यामुळे यावर्षी राज्यात करोनामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या 681 झाली आहे. सध्या राज्यात 467 सक्रिय रुग्ण आहेत.WHO च्या माजी मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी करोनाच्या वाढत्या रुग्णांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “यामुळे घाबरण्याची गरज नाही. करोना व्हायरस भविष्यातही आपल्यासोबतच राहणार आहे. काही महिन्यांच्या अंतराने कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होईल. आपल्याकडे चांगली रोगप्रतिकारशक्ती आहे. लसीकरणामुळे आपल्याला अधिक संरक्षण मिळते. त्यामुळे करोनामुळे होणारा संसर्ग आता खूप सौम्य आहे.”त्या म्हणाल्या, “व्हायरल इन्फेक्शनवर अँटिबायोटिक औषधांचा काहीही परिणाम होत नाही. मग तो कोविड असो, इन्फ्लूएंझा असो किंवा श्वसनमार्गाचा कोणताही व्हायरस असो.

अशावेळी फक्त लक्षणांवर आधारित उपचार घ्या. तुम्ही गरम पाणी पिऊ शकता, गुळण्या करू शकता, त्याने आराम मिळतो. जेव्हा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शनहोते, तेव्हाच अँटिबायोटिक्सची गरज असते.”तज्ञांच्या मतानुसार करोनाची गंभीर परिस्थिती नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेली औषधे नियमित घ्या.करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखा. वारंवार आपले हात साबणाने धुवा.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.