अंगणात खेळताना चिमुकली दिसेनाशी, गावभर शोधलं नंतर घराशेजारीच… लेकीच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा.

हिंगोली जिल्ह्यातील चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीजा बेपत्ता झाल्यानंतर शोधाशोध करत असताना, तिच्या आईला ती पाण्यात पडलेली दिसली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.कुटुंबात चिमुकलीच्या येण्याने आनंद पसरला होता. आनंदाने बागडणाऱ्या चिमुकलीने छोट्याशा पावलाने संपूर्ण घर, अंगण व्यापून टाकलेलं होतं. घरात चिमुकलीमुळे आनंद पसरला होता. मात्र अचानक काळाने या आनंदावर झडप घातली अन् हसतं खेळतं कुटुंब दुःखात बुडालं. औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या चिमेगाव येथील एक चिमुकली लहान मुलांसोबत खेळत असताना शुक्रवारी, ३० मे रोजी एक वाजताच्या दरम्यान अंगणात असलेल्या हौदात पडली आणि चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. चिमुकलीच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.चिमेगाव येथील श्रीनिवास कांगणे यांची दीड वर्षाची श्रीजा हौदात पडली. श्रीजा असं या मृत चिमुकलीचं नाव आहे. रोजच्याप्रमाणे ती बाहेर लहान मुलांसोबत खेळत होती.

आई आपल्या घरातील कामांमध्ये व्यस्त होती. घरातील कामं आटपून काही वेळाने श्रीजा रोजच्या प्रमाणे घरी आली नाही. लेक घरी पोहोचली नसल्याने श्रीजाला पाहण्यासाठी आई अंगणात बाहेर आली. परंतु बाहेर श्रीजा कुठेही आढळून आली नाही.त्यानंतर आईने गावात इतरत्र शोध घेतला तरीही श्रीजा आढळून आली नाही. शेजारीपाजारी विचारपूस केली मात्र श्रीजा कुठेच गेली नव्हती. लेक आजूबाजूला कुठेच मिळत नसल्याने तिच्या आईची चिंता वाढत गेली. आईने संपूर्ण गावात शोध घेतला. त्यानंतर त्यांचं सर्व कुटुंब श्रीजाला शोधत घराबाहेर पडलं.अखेर शेवटी आईला काहीशी शंका आली.

शंका आल्याने श्रीजाच्या आईने घराच्या बाजूला असलेल्या हौदात डोकावून पाहिलं. त्यामुळे चिमुकलीश्रीजा हौदातील पाण्यात बुडाल्याचं दिसून आलं. आईने तातडीने हौदातील पाण्यातून लेकीला बाहेर काढून घाईघाईने औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. आईपासून चिमुकली काळाने हिरावल्याने आईने एकच हंबरडा फोडला. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकलीच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.