बिझनेसमन संतोष लड्डांच्या घरावरील दरोड्याबाबत मोठी अपडेट समोर, भोंदूबाबा कनेक्शन.

शहरातील प्रसिद्ध उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात कोट्यावधी रुपयांचं सोनं असल्याची टीप दरोडेखोरांना देणारा आरोपी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. दरोडा टाकण्यापूर्वी आरोपींनी रेकी करण्यासाठी वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. टीप देणाऱ्याला अटक केल्यामुळे ज्या प्रकरणात आणखी नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.देविदास नाना शिंदे वय 50 रा.शिवाजीनगर वडगाव कोल्हाटी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. देविदास कुटुंबासह वडगाव कोल्हाटी भागात राहून स्कूल बसवर चालक म्हणून काम करतो.

झटपट लखपती होण्यासाठी देविदास भोंदूगिरी करतो. धन दुप्पट करून देतो असतो परिचयातील लोकांना सांगत असतो. यातूनच देविदास ला प्रसिद्ध उद्योगपती संतोष लढ्ढा यांच्या घरात १० कोटी रुपयांचं काळधन असल्याची माहिती मिळाली.देविदास ची योगेश हजबे सोबत मैत्री असल्याने त्यांनी ही माहिती त्याला दिली. इथूनच लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्लॅन सुरू झाला. लढा यांच्या घरात असलेल काळदन लुटल्यानंतर लड्डा पोलिसात तक्रार करू शकणार नाही असा समज दरोडेखोरांचा होता.

यातूनच संतोष लढा यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला.या दरोड्या प्रकरणी पोलिसांनी अमोल बाबुराव खोतकर या मुख्य आरोपीचे एन्काऊंटर केलं. तर यातील योगेश सुभाष हजबे रा.वडगाव कोल्हाटी, सय्यद अझरुद्दीन सय्यद कबिरोद्दीन रा.रांजणगाव शेणपुंजी, सोहेल जलील शेख रा. अंबाजोगाई, सुरेश रामकिसन गंगणे रा. अंबाजोगाई, महेंद्र माधव बिडवे रा. साजापूर यांना अटक केली होती. मात्र टीप देणारा देविदास शिंदे फरार होता. अखेर गुन्हे शाखेच्या प्रयत्नाला यश आले देविदास शिंदे आला अटक करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.