कोणाची पेन्शन गेली, कोणाची जमापुंजी; बचत योजनांच्या नावे गुंतवणूकदारांना गंडा, पतसंस्थेचा कोट्यवधींचा घोटाळा उघड.

या घोटाळ्यामुळे अनेक गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत सापडले असून, काहींनी निवृत्तीनंतर मिळालेला सर्व पैसा याच संस्थेत गुंतवला होता. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमिन हादरली आहे. प्रशासनाकडे गुंतवणूकदारांनी मागणी केली आहे की, दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्या जमा रकमेची परतफेड लवकरात लवकर केली जावी.नागपूरच्या इंदोरा परिसरातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून, नागरिकांच्या मेहनतीच्या पैशाची फसवणूक झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जनार्दन राऊत यांच्यासह संचालक मंडळातील इतर २० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.२०१९ ते २०२३ या कालावधीत संस्थेने एफडी (मुदत ठेव) आणि विविध बचत योजनांच्या नावाखाली सामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. परंतु, नियमानुसार ही रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यात आली नाही.

अशी माहिती विशेष लेखापरीक्षक नारायण गाढेकर यांनी त्यांच्या अहवालात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आणि सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.या काळात संस्थेने एजंट्सच्या मदतीने नागरिकांचा विश्वास संपादन केला आणि मोठ्या प्रमाणात निधी जमा केला. मात्र, ही रक्कम संस्थेच्या विकासासाठी वापरण्याऐवजी संबंधित पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचा ठपका आहे. गुंतवणूकदारांना परतावा वेळेवर मिळाला नसल्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आला.

विशेष लेखापरीक्षकांनी पतसंस्थेची सखोल चौकशी केली असता, अनेक आर्थिक अनियमितता समोर आल्या. यावर आधारित पोलिसांनी पुरावे गोळा करणे सुरू केले असून प्रकरणाच्या गांभीर्यामुळे कायदेशीर कारवाईला गती देण्यात आली आहे.या घोटाळ्यामुळे अनेक गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत सापडले असून, काहींनी निवृत्तीनंतर मिळालेला सर्व पैसा याच संस्थेत गुंतवला होता. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमिन हादरली आहे. प्रशासनाकडे गुंतवणूकदारांनी मागणी केली आहे की, दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्या जमा रकमेची परतफेड लवकरात लवकर केली जावी. सध्या तपास सुरू असून, पोलिसांकडून या प्रकरणात आर्थिक घोटाळा सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावे गोळा केले जात आहेत. नागपूरमधील हा एक गंभीर आर्थिक फसवणूक प्रकरण ठरले असून, या प्रकरणाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.