कुटुंब कार्यक्रमासाठी निघालेलं, वाटेत भयंकर घडलं; दोन बालकांसह तिघांचा मृत्यू, वाहनांचा चक्काचूर.

हिंगोलीच्या वसमतमध्ये कारने टिप्परला धडक दिली. या भीषण अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला असून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.गजानन पवार हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यात असलेल्या कोठारी फाटा ते टोकाई मार्गावरील टोकाई फाट्या जवळ शुक्रवारी, ३० मे रोजी रात्री साडेनऊ वाजता एका कारचा भीषण अपघात झाला.

रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परचा कार चालकाला अंदाज न आल्याने आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने पाठीमागून येऊन टिप्परला जोराची धडक दिली.यामध्ये दोन बालकांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पाच जणांना नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील बोर्डा येथील कुटुंब खाजगी कार्यक्रमासाठी कारने वसमतकडे निघालं होतं.कार टोकाई शिवारात आली आणि कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून बाजूला उभ्या टिप्परच्या पाठीमागून जोराची धडक बसली.या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे. तर टिप्परचा चक्काचूर झाला आहे. शेख अमीर (४०) यांच्यासह यांच्या दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.