पालघरमधून हादरवणारी बातमी समोर येत आहे. सतरा वर्षांच्या अल्पवयीन तरुणीला गावठी बंदुकीतून गोळी लागल्याची घटना केळवे परिसरात घडली आहे. एका हॉटेलमधील रूममध्ये हा प्रकार घडला आहे.पालघरमधून हादरवणारी बातमी समोर येत आहे. सतरा वर्षांच्या अल्पवयीन तरुणीला गावठी बंदुकीतून गोळी लागल्याची घटना केळवे परिसरात घडली आहे. केळवे येथील एका हॉटेलमधील रूममध्ये हा प्रकार घडला आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी तरुणीसोबत असलेल्या अठरा वर्षाच्या प्रियकर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या केळवे येथे सतरा वर्षाची अल्पवयीन तरुणी तिच्या अठरा वर्षाच्या प्रियकरासोबत आली होती. राऊत रेसिडेन्सी या हॉटेलमधील एका रूममध्ये हे दोघे थांबले होते. अठरा वर्षाच्या तरुणाकडे गावठी बंदूक असल्याने तरुणाच्या बॅगमध्ये असलेल्या गावठी बंदुकीचे ट्रिगर अपघाताने दाबले गेल्याने तरुणीला या गावठी बंदुकीतून गोळी लागली.










