विभागातील सुमारे १७ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे मातेरे झाल्याची बाब नाशिक विभाग कृषी सहसंचालक यांच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात ५ ते २८ मे या २४ दिवसांच्या कालावधीत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी घातलेल्या थैमानामुळे ४१ हजार १२ शेतकऱ्यांना फटका बसला. विभागातील सुमारे १७ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे मातेरे झाल्याची बाब नाशिक विभाग कृषी सहसंचालक यांच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.सर्वाधिक २३ हजार १११ शेतकऱ्यांच्या ७ हजार ३३७ हेक्टरवरील विविध शेतपिकांचे नुकसान केवळ नाशिक जिल्ह्यात झाले. जळगाव जिल्ह्यातही १२ हजार ६७५ शेतकऱ्यांच्या ६ हजार ६१८ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिके या अवकाळी पावसाने हिरावून नेली. आता पंचनामे होऊन शासकीय नुकसानभरपाई कधी मिळणार याकडे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.










