चेहऱ्यावर ट्रिम केलेली दाढी, दक्षिणा म्हणून मागितली जेसीबी अन् थार गाडी, ‘शौकीन’ साधूला पैशाचा मोह सुटेना, अखेर….

चेहऱ्यावर ट्रिम केलेली दाढी, दक्षिणा म्हणून मागितली जेसीबी अन् थार गाडी, ‘शौकीन’ साधूला पैशाचा मोह सुटेना, अखेर….रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये जादूटोणा आणि देवस्कीच्या नावाखाली एका व्यक्तीने लोकांना 40 लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश मोरे आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून हा फ्रॉड केला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत 3 तक्रारी दाखल झाल्या आहेत. आरोपींनी आणखी काही जणांना फसवलं असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.महेश योगेश्वर मोरे (वय 53), मीर मांजरेकर उर्फ मिहीर मोरे (वय 24), सागर यशवंत कुंड (वय 34) आणि अपूर्वा महेश मोरे (वय 50) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व अलिबागच्या ठिकरूळ नाक्याचे रहिवासी आहेत.

पोलिसांनी या चौघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.पनवेलमधील बांधकाम व्यावसायिक असलेल्या तक्रारदाराची अलिबागमध्ये काही कामं सुरू होती. त्या कामाचे पैसे अडकले होते. फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, “पैसे मिळवून देण्यासाठी मोरेंनी त्याला देवस्की आणि जादूटोणा करण्याचा सल्ला दिला. त्याने माझा विश्वास संपादन करून वेळोवेळी पैसे मागितले. आतापर्यंत मोरेने 38 लाख 50 हजार रुपये घेतले.” असे देखील फिर्यादीने सांगितले.दुसऱ्या एका कुटुंबाला घरातील वाद मिटवण्यासाठी आणि सुख-शांती मिळवण्यासाठी मोरेने मंतरलेले दगड घराभोवती फिरवण्यास सांगितले. यासाठी त्यांनी 2 लाख 25 हजार रुपये घेतले. याशिवाय आणखी एका व्यक्तीला 1 लाख 29 हजार रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. या मांत्रिकाने लोकांचा विश्वास संपादन करून एक जेसीबी आणि एक थार गाडी स्वतःसाठी मागून घेतली, अशी माहितीही समोर आली आहे.आरोपींना अलिबाग कोर्टात हजर केले. कोर्टाने महिला आरोपीला जामीन मंजूर केला आहे. उर्वरित तीन आरोपींना 3 जून 2025 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर साळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. “आरोपींकडून आणखी काही जणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.