पुण्यातील प्रभात रस्त्यावर राहणारे डॉ. दीपक महाजन यांचे जुलै 2006 मध्ये अपहरण करून, 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा निर्घृण खून करून त्यांच्या शरीराचे आठ तुकडे करण्यात आले पुण्यातील बहुचर्चित डॉ. दीपक महाजन हत्याकांड प्रकरणात जन्मठेप झालेल्या लीना अनिल देवस्थळी (वय 65) हिची 19 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर नुकतीच सुटका करण्यात आली. राज्यात खळबळ उडवून दिलेल्या या गुन्ह्यात लीना देवस्थळी व तिची मुलगी दीप्ती यांना पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करून, जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.जन्मठेपेची शिक्षा झालेल्या साठ वर्षांवरील वयस्कर व अशक्त महिला बंदीजनांना मुक्त करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे लीना देवस्थळीची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून नुकतीच सुटका करण्यात आली.पुण्यातील प्रभात रस्त्यावर राहणारे डॉ. दीपक महाजन यांचे जुलै 2006 मध्ये अपहरण करून, 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा निर्घृण खून करून त्यांच्या शरीराचे आठ तुकडे करून, कात्रजच्या घाटात व लोणावळ्यात फेकून देण्यात आल्याचे उघडकीस आले होते.










