देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबविला गेला,त्या पार्श्वभूमी वर सायगाव येथे समाज सुधारक व क्रांतिकारी वेशभूषा करून चिमुकल्यांनी सर्वांची मने जिंकली.

सायगाव (चाळीसगाव)

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबविला गेला,त्या पार्श्वभूमी वर सायगाव येथे समाज सुधारक व क्रांतिकारी वेशभूषा करून चिमुकल्यांनी सर्वांची मने जिंकली.

दिपप्रज्वलन तसेच भारत माता प्रतिमेचे पूजनाचा यंदाचा मान त्रिपुरा,आसाम BSF‌ येथे देशसेवा बजवत असलेले अक्षय सूर्यवंशी यांचे आई-वडील “सैनिक माता पिता” यांच्या शुभहस्ते झाले.तसेच मीनाताई व सुनील सूर्यवंशी या सैनिक माता पिताचा भारती सूर्यवंशी तसेच विश्व राजभारती संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र सूर्यवंशी(राजू बाबा) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रात शांतता राखण्यासाठी जागतिक संघटनेत18 वर्ष देशसेवा बजावलेले तसेच पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी असलेले आजच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वीर पूजनाचा मान यावेळी अतिथी मान्यवर मा.सहा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय सुर्यवंशी  यांना मिळाला.

संस्थेच्या मुख्याध्यापिका प्रिया सूर्यवंशी मॅडम यांना ध्वज पूजनाचा मान मिळाला.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे, शिक्षण हेच कर्म व समाजसेवा हाच धर्म मानणारे, टीचर्स अँड लॉ स्टुडन्ट असोसिएशन अध्यक्ष तथा विश्व राजभारती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भूषणजी सूर्यवंशी सर होते. त्यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनी #ध्वजारोहण” झाले. या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम गुरुकुल च्या प्रांगणात झाला,यावेळी भारत माता की जय..! हर घर तिरंगा. हर मन तिरंगा. वंदे मातरम. गिरणा नदी का धो-धो पाणी हम सब बच्चे हिंदुस्तानी च्या घोषणांनी परिसरात चैतन्याचे वातावरण तयार झाले होते.
यावेळी जयघोषात विद्यार्थ्यांची परेड पार पडली तसेच उपस्थित मान्यवरांसमोर देशभक्तीपर गायन, मराठी ,हिंदी ,इंग्लिश या भाषेतून उत्कृष्ट भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली यावेळी चिमुकल्यांनी भाषण व समाजसुधारकांच्या वेशभूषा करून प्रेक्षकांची मने जिंकत कौतुकाचे थाप मिळवली.

विश्व राजभारती संस्थेच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल व SRSS विश्व गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल चे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी-पालक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.यावेळी विश्व गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक तथा सचिव शुभम सुर्यवंशी , सक्षम फाउंडेशन अध्यक्षा तथा गुरुकुलच्या प्रिन्सिपल पी.बी.सूर्यवंशी ,जे.एस.पगार,ए.एस.बच्छे,एम.एन.माळी,व्ही.एस.पाटील  , एल एस भदाणे , एम एन मंसूरी , व्ही एस खैरनार,सचिन पगार,शाम शिंदे,नाना देवरे, लखन वाघ तसेच कार्यक्रमाचे संयोजक डी एस कुलकर्णी , राहुल शिंदे आदी शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट असं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली पाटील  व लीना भदाणे  यांनी केले. तसेच उपस्थित पंचक्रोशीतील मान्यवरांचे आभार संस्थेच्या वतीने प्रिन्सिपल प्रिया सूर्यवंशी यांनी मानले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.