
सरकारी नोकरीसाठी अनेक जण धडपड करत असलेल्या दोन भावांना लाखोंचा गंडा घातला. महाजन यांचे विश्वासू चालक असल्याचे सांगून दोन भावंडांना नोकरी लावून देण्याच्या नावावर २८ लाख ५० हजारांनी फसवणूक करण्यात आली.सरकारी नोकरीसाठी अनेक जण धडपड करत असतात मात्र काही लोक हे चुकीच्या लोकांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यामुळे नोकरी तर मिळत नाही पण स्वत:च लाखोंच नुकसान करून घेतात. नोकरी देतो सांगून लुबाडणाऱ्याची टोळी कोणत्याही मोठ्या व्यक्तीची ओळख सांगते अन् गरजूला ते खरं वाटतं मात्र ज्यावेळी सत्य समोर येते त्यावेळी त्या व्यक्तीने समोरच्याला लाखों रुपये दिलले असतात. असाच प्रकार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेत एक टोळीने दोन भावांसोबत केला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू चालक असल्याचे सांगून दोन भावंडांना नोकरी लावून देण्याच्या नावावर २८ लाख ५० हजारांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांवर गुन्हे नोंदवले.
संदीप तुळशीराम आडे (३२), नीलेश साहेबराव राठोड (३५, दोघेही रा. बोरनगर, पुसद), रिधीर भिका राठोड (३८), लता रिधीर जाधव (३५, दोघेही रा. कुलाबा, मुंबई), रितेश उत्तम पवार (३२ रा. मुंबई) अशी आरोपींची नावे आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भागात असलेल्या हनवतखेडा येथील अंकुश प्रेमदास चव्हाण व सुमित परसराम चव्हाण हे दोघे चुलत भाऊ नोकरीच्या शोधात होते. त्याची माहिती संदीप राठोड व नीलेश राठोड यांना समजल्यावर त्यांनी ‘तुम्हाला नोकरी लावून देतो’ असे सांगितले. विश्वास बसण्यासाठी त्यांनी रिधीर जाधव व त्यांची पत्नी लता जाधव यांच्याशी मोबाइलवर बोलणे करून दिले.