
शिल्पा यांना आधीच्या पतीपासून एक मुलगा आहे. मात्र, पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती विभक्त झाली होती. त्यानंतर मल्लिकार्जुन याच्याशी शिल्पाचे प्रेमसंबंध जुळले. मल्लिकार्जुन ठेकेदार आहेपतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यात नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धायरी परिसरात घडली. शिल्पा मल्लिकार्जुन चलवादी (वय २६, रा. गजानन संकुल, धायरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पत्नीचा शारिरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी मल्लिकार्जुन मऱ्याप्पा चलवादी (वय २६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शिल्पा यांना आधीच्या पतीपासून एक मुलगा आहे. मात्र, पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती विभक्त झाली होती. त्यानंतर मल्लिकार्जुन याच्याशी शिल्पाचे प्रेमसंबंध जुळले.
मल्लिकार्जुन ठेकेदार आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांनी विवाह केला. त्यानंतर शिल्पा मुलासह मल्लिकार्जुन याच्यासोबत धायरीत राहायला आली.शिल्पा गरोदर होती. शुक्रवारी (११ एप्रिल) तिने मुलाला बहिणीकडे सोडले.रुग्णालयात तपासणी करायला जाते, असे तिने सांगितले. त्यानंतर ती धायरीतील घरी आली. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान, शिल्पाचा संपर्क होत नसल्याने बहिणीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली. शिल्पाने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.आत्महत्या करण्यापूर्वी शिल्पाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर शिल्पाचे वडील भीमाप्पा चौडप्पा चलवादी (वय ५३, रा. रेल्वे उड्डाणपुलाजवळ, मुंढवा) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करत आहेत.दुसरीकडे, तळोजा कारागृहात गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीच्या मृतदेहावर रात्री उशिरा विठ्ठलवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता.गवळीने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. त्याने रविवारी तळोजा कारागृहात टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली होती. यानंतर कारागृह प्रशासनाने विशालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात धाडला होता. रात्री उशिरा त्याचा मृतदेह कुटुंबीयाच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर अंतिम संस्कार केले.
Video Player
00:00
00:00