
माजी खासदाराचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यात थोडक्यात पराभव, आता पुन्हा भाजपमध्ये सक्रीय झाले आहे.राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अक्कलकुवा मतदारसंघाची जागा भाजपाला सुटावी अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र अक्कलकुव्याची जागा शिंदे शिवसेनेला मिळाली. 2024 मध्ये झालेल्या लोकसभेत शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाच्या विरोधात काम करत काँग्रेसला मदत केली होती.महायुतीबाबत शिंदे गटाची गद्दारी असल्याचे सांगत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपला रामराम केला आहे. त्यानंतर त्या भाजपाचा कार्यक्रमापासून लांब दिसत होत्या.
मात्र तब्बल चार महिन्यानंतर त्या भाजपाच्या कार्यक्रमात व त्या पुन्हा पक्षात सक्रिय झाल्या आहेत.
नंदुरबार लोकसभेत 2024 मध्ये भाजपातर्फे डॉ.हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आले. मात्र शिंदे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांना मदत न करता काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केली होती. त्या निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागतात अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ हा भाजपाला सुटावा अशी मागणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली. या जागेचा तिढा शेवटपर्यंत सुरूच होता. अखेर अक्कलकुवा विधानसभेची जागा शिंदे शिवसेनेला सुटली. त्या ठिकाणी आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. शिंदे गटाचे नेते काँग्रेसचा प्रचार केला. महायुतीबाबत शिंदे गटाची गद्दारी केली.शिंदे गटाच्या विरोधी भूमिकेमुळे डॉक्टर हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
महायुतीत निष्ठा आम्हीच पाळायची का? असा सवाल करत माझ्यामुळे पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचण होऊ नये म्हणून डॉक्टर हिना गावित यांनी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिला होता.डॉक्टर हिना गावित या विधानसभा निवडणुकीनंतर तीन महिन्यापर्यंत भाजपाच्या स्टेजवर दिसले नाहीत. मात्र सहा एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिनाच्या सोहळ्यात उपस्थित राहून भाजपात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान शिंदे शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील चंद्रकांत रघुवंशी यांना आमदारकी देऊन जिल्ह्यात ताकद वाढवण्यात येत आहे. भाजपा कडून नंदुरबार जिल्ह्याची ताकद कमी करून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. उघडपणे भाजपाला विरोध करणाऱ्या नेत्यांना पदे मिळत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना तसेच भाजपामध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Video Player
00:00
00:00