
महायुतीमध्ये अंतर्गत नाराजीनाट्य सुरू असल्याचं कानावर येत आहे. अशातच निधीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार केल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संंजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाहीतर यावर अमि शहा यांनी दिलेलं उत्तर समोर येईल तेव्हा राज्याचं चित्र स्पष्ट होणार असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.आता लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारायला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींकडून १५०० रूपयांच्य बदल्यात मते विकत घेतलीत त्याच मतांची किंमत आत ५०० वर आली आहे. उद्या ती आता शून्यावर येईल. या राज्याची आर्थिक परस्थिती बिकट आहे, सरकारी कर्माचाऱ्यांते पगार द्यायला पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी कितीही मोठ्या वल्गना कराव्यात, आव आणावा पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नाही.
त्याचं कारण गेल्या साडे तीन वर्षामध्ये राज्याची आर्थिक शिस्त बिघडली, आर्थिक अराजक अशा खाईमध्ये हे राज्य सापडलं आहे. अजित पवार बोलत नसले तरी त्यांना त्या चिंतने ग्रासल्याचं राऊत Sajay Raut यांनी म्हटलं आहे.
अमित शाह यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली, अजित पवार आपल्या फाइल मजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला म्हणजे कोणाला हा प्रश्न आमच्यसारख्या लोकांना पडतो. तुमचे ५-२५ आमदार हे फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्यासोबत राहिले. या राज्याची परवानगी तुम्हाला हवी आहे का? यावरचं अमित शहांनी काय उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. काय म्हणाले हे जर लोकांसमोर आलं तर राज्याचं चित्र स्पष्ट होईल. शिंदेनी टुमणं लावलं तेव्हा शहांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुण्यामध्ये पहाटे संवाद झाला तेव्हाचा संवाद जशाच्या तसा खरा ठरला.
त्याचा कोणी इन्कार केला नसल्याचं राऊत म्हणाले.पत्रकारांनी राऊतांना तुम्हाला कोण माहिती देतं याबद्दल विचारल्यावर, माझं नाव संजय राऊत आहे, हा संजय महाभारतातही होता. जो सर्व चित्र डोळ्यात कानात साठवायचा, आमच्याकडे लोकं आहेत ना, ते महत्त्वाचे लोक आहेत. ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. अमित शहांनी काढेलली समजूत काढली ती पत्रकार म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न करा. एक दिवस भाजपच्या गोटातूनच समजेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Video Player
00:00
00:00