मेट्रोची पिवळी मार्गिका मुंबईकरांसाठी सज्ज, सहा डब्यांची अत्याधुनिक गाडी, कुठून कुठे जाणार.

मुंबईत आता ‘मेट्रो-२ ब’च्या रूपात नवी मार्गिका सुरू करण्यासाठीची तयारी गाडी चाचणीच्या निमित्ताने होत आहे.जवळपास अडीच वर्षांनी नवीन उन्नत मेट्रो मार्गिका ‘मेट्रो-२ ब’ (पिवळी मार्गिका) मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. त्यानिमित्ताने या मार्गिकेतील गाडीची पहिली चाचणी बुधवार, १६ एप्रिलला होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ही मार्गिका बांधली जात आहे. मुंबईकरांसाठी सध्या चार मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. त्यातील तीन (मेट्रो १, मेट्रो २ अ व मेट्रो ७) उन्नत आहेत. यापैकी ‘मेट्रो-२ अ’ व ‘मेट्रो-७’चा अखेरचा टप्पा १९ जानेवारी २०२३ रोजी कार्यान्वित झाला होता. त्यानंतर आता ‘मेट्रो-२ ब’च्या रूपात नवी मार्गिका सुरू करण्यासाठीची तयारी गाडी चाचणीच्या निमित्ताने होत आहे.

‘या मार्गिकेसाठी सहा डब्यांची अत्याधुनिक पद्धतीची गाडी आहे. ती अपेक्षित असलेला वेग घेते का? त्यासाठी आवश्यक तितका वीजपुरवठा होतो का? तसेच गाडीशी निगडित सर्व प्रणाली कार्य करीत आहेत का? याची तपासणी याचाचणीदरम्यान केली जाईल’, अशी माहिती ‘एमएमआरडीए’तील सूत्रांनी दिली.‘मेट्रो-२ ब’चा डेपो मंडाळा येथे असून तिथेच पहिले स्थानक आहे. त्यानुसार ही चाचणी मंडाळा डेपो ते चेंबूर येथील डायमंड गार्डन, अशा पाच स्थानकांदरम्यान ताशी ८० किमीच्या वेगाने होणार आहे.

यासाठी ‘एमएमआरडीए’ने केंद्र सरकारी भारत अर्थमुव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) यांच्याकडून डबे खरेदी केले आहेत.‘एमएमआरडीए’अंतर्गत कार्यान्वित असलेल्या उभ्या होणाऱ्या व सध्या बांधकामाधीन असलेल्या सर्व मार्गिकांसाठी एकत्रितपणे या डब्यांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे हे डबे ‘मेट्रो-२ अ’ व ‘मेट्रो-७’प्रमाणेच आहेत; मात्र ही पिवळी मार्गिका असल्याने गाडीचा रंग पिवळा असेल.

  • Related Posts

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी झाले आहेत. पहलगाम परिसरात पर्यटकांची कायम गर्दी असते. दरवर्षी लाखो पर्यटक या भागाला भेट देतात.श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा…

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

     जालना जिल्ह्यातील फत्तेपूर येथे एका १८ वर्षीय अविवाहित तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल आघाम या तरुणाने लग्नाची धमकी दिल्याने तिने त्याच्या घरी आत्महत्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

    अँटिलिया वक्फची संपत्ती? मुकेश अंबानींवर जमीन हडपल्याचे आरोप; या व्यक्तीने बनवलेले अनाथाश्रम.

    अँटिलिया वक्फची संपत्ती? मुकेश अंबानींवर जमीन हडपल्याचे आरोप; या व्यक्तीने बनवलेले अनाथाश्रम.

    दोन दुचाकीची जबर धडक : महिला जखमी !

    दोन दुचाकीची जबर धडक : महिला जखमी !