
महामानवाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1937 साली सोलापूर दौऱ्यावर होते. बाबासाहेबांच्या या दौऱ्याच्या स्मृती सोलापूरकरांनी आज ही जपून ठेवल्या आहेत.बोधिस्तव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आहे. देशभरात मध्यरात्रीपासूनच मोठ्या उत्साहात महामानवाला वंदन करण्यासाठी भीम अनुयायी रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आज अभिवादन करत असताना त्यांच्या असंख्य आठवणी आजही भारतीयांसाठी पूजनीय आहे. असाच अमूल्य ठेवा सोलापूरकरांनी जपून ठेवला आहे. महामानवाच्या 1937 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. बाबासाहेबांच्या या दौऱ्याच्या स्मृती सोलापूरकरांनी आज ही जपून ठेवल्या आहेत.त्याकाळी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने विहीर बांधली होती. लोकांनी या विहिरीतून पाणी काढण्याची विंनती बाबासाहेबाना केली. लोकांच्या आग्रहाखातर रेशीमच्या दोरखंडाने चांदीच्या पेल्यातून बाबासाहेबांनी पाणी काढले.
त्याकाळी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने विहीर बांधली होती. लोकांनी या विहिरीतून पाणी काढण्याची विंनती बाबासाहेबाना केली. लोकांच्या आग्रहाखातर रेशीमच्या दोरखंडाने चांदीच्या पेल्यातून बाबासाहेबांनी पाणी काढले.त्यानंतर स्वतः हे पाणी प्राशन केलं. तेव्हापासून आजतगायत वळसंग गावातील हजारो नागरिक या विहिरीतील पाण्याला अमृताहून अधिक महत्व देतात.वळसंग येथीलया ऐतिहासिक क्षणावरून विहिरीला ‘आंबेडकर बावडी’ असं नावं देण्यात आलय. वळसंग येथील ‘आंबेडकर बावडी’ विहिरीवर आजही भीम अनुयायी भेट देतात. नुकतचं या विहिरीवर प्रशासनाच्यावतीने डोम देखील वांधण्यात आले आहे.बाबासाहेबांच्या दौऱ्यांची अशीच आठवण सोलापुरातील पसलेलू कुटुंबाने जपून ठेवलीय.
14 जानेवारी 1946 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते.त्यावेळी फ़ॉरेस्ट भागातील गंगा निवास येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्काम केला. सकाळी याचं घरात बाबासाहेबांनी नाश्ता ही केला. याच आठवणी जपत ज्या ताटात बाबासाहेबांनी नाश्ता केला ते ताट, ग्लास, वाटी, कप असे सर्व साहित्य पसलेलू कुटुंबाने मोठ्या अभिमानाने जपून ठेवल्या आहेत.भीम अनुयायी देखील मोठ्या कौतुकाने या गंगा निवासला भेट देतात.बाबासाहेबाच्या अशा स्मृती आपल्या घरात असल्याने अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया पसलेलू कुटुंबिय व्यक्त करतायत.
Video Player
00:00
00:00