
गंगापूर रोडवरील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील रजिस्ट्रारच्या चारित्र्यावर संशयित यूजरने फेक अकाऊंटवरुन शिंतोडे उडवत तिची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या फेसबुक यूजरने अकाउंटला शिक्षण संस्थेचे नामसाधर्म्य वापरुन गेल्या सप्टेंबर २०२३ पासून शिक्षण संस्थेतील कारभारावर विविधांगी टीका केल्याचे समोर येत आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी ‘मेटा’कडे पत्रप्रपंच सुरु केला आहे.४३ वर्षीय पीडिता गेल्या काही वर्षांपासून या संस्थेत रजिस्ट्रारपदी कार्यरत असून तिच्या फिर्यादीनुसार, अनोळखी संशयिताने सन २०२३ पासून फेसबुकवर ‘मविप्रचे रामराज्य’ या नावे फेक अकाऊंट व यूआरएल बनवून अनेक पोस्ट व मजकूर अपलोड करुन सार्वत्रिक केला आहे. त्यात, पीडितेचे याच संस्थेतील वरिष्ठाशी अनैतिक संबंध असल्याचा दावा करुन तशा आशयाचा आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला.
दरम्यान, आपल्याबाबत हिणकस व वैयक्तिक स्वरुपाची टीका होत असल्याचे कळताच तिने शुक्रवारी (दि.११) तत्काळ नाशिक शहर सायबर पोलीस ठाणे गातून फिर्याद नोंदविली.त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक धीरज गवारे यांनी मेटाकडून संबंधित अकाऊंटधारकाची तांत्रिक माहिती मागविली असून पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, संशयिताने (Suspected) या पोस्टसह संस्थेतील कारभार, गैरकारभार व इतर स्वरुपांच्या तक्रारींबाबत पोस्ट व मजकूर अपलोड केला असून या अकाऊंटला चार हजार ९९९ अनुसारक अॅड असल्याचे समजते. तसेच पीडितेबाबत २६ मार्च २०२५ रोजी पोस्ट अपलोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवित तिचा विनयभंग केल्यासह महाविद्यालयातील साडेतीन हजार विद्यार्थी, त्यांचे पालक, संस्थेचे हितचिंतक व नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये तिच्या चारित्र्याबाबत संशय निर्माण केला. पीडितेची खासगी सॅलरी स्लिप विनापरवानगी प्रसारित केली. त्यामुळे फेक फेसबुक प्रोफाईल अकाउंटधारक व पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रद्दीचोर शिक्षणाधिकाऱ्याने कॉलेजच्या सौंदर्यात जून २०२२ ते जानेवारी २०२५ पर्यंत ५५ हजार ते १ लाख ८१ हजारांपर्यंतची वाटचाल केली. ३० महिन्यांच्या कालावधीत १ लाख २७ हजार रुपयांची घसघशीत वाढ .प्रत्येक महिन्याला रु. ४ हजार २५० रुपयांची गुलाबी वाढ. संस्थेच्या कोणत्या ठरावानुसार ही वाढ झाली?. अधिकाऱ्यांनी कोणत्या निकषानुसार पगारवाढ केली? असे कोणते लक्षवेधक काम या रजिस्ट्रारांनी केले? संस्थेच्या १११ वर्षांत नॉन टीचिंग कर्मचाऱ्याला एवढी पगारवाढ देणे एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे.