
हार्दिक पंड्याने यावेळी मुंबईचा संघ कोणत्या एका गोष्टमुळे जिंकला, हे सांगितले आहे. पण मुंबईला हा थरारक विजय कशामुळे मिळाला, हार्दिक नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या…मुंबई इंडियन्सने दिल्लीवर थरारक विजय साकारला. कारण हा सामना दिल्ली जिंकेल, असे वाटत होते. पण त्याचवेळी मुंबईच्या बाजूने हा सामना फक्त एकाच गोष्टीमुले फिरला, असे मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याचे म्हणणे आहे.हार्दिक म्हणाला की, ” विजय नेहमीच सुखावणारा असतो. जिंकणे नेहमीच खास असते आणि ते पण या अशा थरारक सामन्यांमध्ये. तुम्हाला लढत राहावे लागते आणि तेच सर्वात महत्वाचं असतं. दिल्लीच्या फलंदाजांना कशी गोलंदाजी करायची याचे पर्याय आमच्यासमोर होते. त्यांनी आमच्या गोलंदाजांना ज्या पद्धतीने तोंड दिले, ते पाहता सामना रंजक झाला होता. पण आम्ही मागे हटलो नाही, संधी मिळत गेल्या आणि त्याचे सोने करत गेलो.
कर्ण शर्मा हा ज्या पद्धतीने तो कामगिरी करत होता, त्यावरून त्याने किती मेहनत घेतली आहे ते दिसून येते. मला वाटते की त्याने आम्हाला आश्चर्यचकित केले. जबरदस्त कामगिरी त्याने केली. संघात येऊन त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याला तोड नव्हती, त्याने खूप मनापासून गोलंदाजी केली, विशेषतः अशा छोट्या मैदानावर त्याने केलेली कामगिरी लाजवाब आहे. “हार्दिक पुढे म्हणाला की, ” मला नेहमीच वाटते की क्षेत्ररक्षण ही अशी गोष्ट आहे जी खेळाचे चित्र बदलू शकते. या एका गोष्टीमुळेच सामना फिरला. या सामन्यात आम्ही हार मानली नाही आणि त्यांनी संधी मिळत गेलया आणि चित्र बदलत गेले.
सर्व काही आश्चर्यकारक असल्यासारखे वाटत होते. फलंदजी कशी असावी हे नेहमीच परिस्थितीवर अवलंबून असेल. फॉर्ममध्ये असलेले खेळाडू जितके जास्त चेंडूंना तोंड देण्याचा प्रयत्न करतील आणि जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करतील, तेच आमच्यासाठी महत्वाचे असेल. एका विजयाने बरंच काही बदल असतं आणि बरंच काही परत मिळत असतं, असा एकच सल्ला माझा मुंबईच्या खेळाडूंना असेल. “हार्दिक पंड्या या सामन्यानंतर चांगलाच भावूक झाला होता. त्याचा इोमशनल व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला आहे.
Video Player
00:00
00:00