
रोहित शर्मा मैदानात नसला तरी त्याने हा सामना फिरवला. रोहित शर्माने डग आऊटमध्ये असताना हार्दिक पंड्याला मार्गदर्शन केले आणि तिथेच हा सामना कसा फिरला, जाणून घ्या…हार्दिकच्या मदतीला रोहित शर्मा धावला, डग आऊटमध्ये बसून कशी मॅच फिरवली, जाणून घ्या..रोहित शर्मा किती चाणाक्ष कर्णधार आहे, हे पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सला विकेट मिळत नव्हती. रोहित शर्माला त्यांनी डग आऊटमध्ये बसवले होते. पण डग आऊटमध्ये बसूनही रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला. रोहित शर्माने डग आऊटमधून एक असा सल्ला दिला की, त्यामुळे हा सामना फिरल्याचे पाहायला मिळाले.दि्ललीची २ बाद ११९ अशी अवस्था होती. मुंबई विकेट्सच्या शोधात होती, पण त्यांना विकेट्स काही मिळत नव्हती. हार्दिक पंड्याने त्यावेळी नेमकं काय करावं, ते सुचत नव्हतं. त्यामुळे तो कोणताही निर्णय घेत नव्हता. रोहित शर्माला त्याने मैदानाबाहेर काढले होते. पण रोहित शर्माने त्याचा राग मानला नाही. संघासाठी काहीही करून मदत करायची, हे रोहितने ठरवले होते.
त्यामुळे जेव्हा मुंबईला विकेटची गरज होती, तेव्हा रोहित शर्मा डग आऊटमधून उठला आणि तो महेला जयवर्धने यांच्या दिशेने गेला.रोहित शर्मा जयवर्धने यांच्याजवळ गेला आणि त्यांना सांगितले की, मैदानात आता विकेट मिळवायची असेल तर त्यासाठी एक बदल करायला हवा. आता जर फिरकी गोलंदाजांना संधी दिली, खासकरून कर्ण शर्माला तर मुंबईच्या संघाला विकेट्स मिळू शकतात. रोहित शर्माने ही गोष्ट हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना मैदानात सांगितली. त्यानंतर मुंबईला अभिषेक पोरेलची विकेट मिळाली. त्यानंतर तुफानी फटकेबाजी करणारा करुण नायरही फिरकी गोलंदाजीवर बाद झाला.
कर्ण शर्माने त्यानंतर लोकेश राहुलला बाद केले आणि मुंबईसाठी विजयाचे दार उघडले. कर्ण शर्माने त्यानंतर स्ट्रिस्टन स्टब्सलाही बाद केले. त्यानंतर विप्रज निगम हा दमदार फलंदाजी करत होता, त्याला फिरकीपटूनेच बाद केले. त्यामुळे फिरकी गोलंदाजांमुळे यावेळी मुंबईच्या बाजूने सामना जिंकला.रोहित शर्माने सामना सुरु असताना हार्दिकला मदत केली आणि त्यामुळेच हा सामना मुंबईला जिंकता आला. त्यामुळे रोहित शर्माला या विजयाचे श्रेय द्यायला हवे. दुसरीकडे हार्दिक रोहितला फिल्डींगच्या वेळी संघाबाहेर ठेवून किती मोठी चूक करतो, हे आता समोर आहे.
Video Player
00:00
00:00