चारित्र्यावर घ्यायचा संशय, भावाच्या मदतीने डॉक्टर पत्नीला संपवलं, खळबळजनक घटना.

नागपुरात एका धक्कादायक घटनेत, शासकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अर्चना राहुले यांचा त्यांच्या पतीने भावाच्या मदतीने खून केला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून अनिल राहुले यांनी भाऊ राजू सोबत मिळून हा कट रचला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.भावाच्या मदतीने पतीने रॉडने वार करून डॉक्टर पत्नीचा खून केला. ही थरारक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडीकर लेआऊट येथे उघडकीस आली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. डॉ. अनिल शिवशंकर राहुले (वय ५२)आणि त्याचा भाऊ राजू राहुले (वय ५९) अशी अटकेतील मारेकऱ्यांची तर डॉ. अर्चना अनिल राहुले (वय ५०) असे मृतकाचे नाव आहे. अर्चना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरेपी विभागात साहाय्यक प्राध्यापक होत्या. अनिल हा रायपूर मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहे. राजू हा खेरलांजी येथे शेती करते. अर्चना यांचा मुलगा आदित्य हा करीमनगर येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला शकतो.

पोलिसांनीकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांपासून अनिल हा अर्चनाच्य चारित्र्यावर संशय घ्यायला. त्यांना मारहाण करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने अर्चना यांना ठार मारण्याची धमकी दिली. ही बाब अर्चना यांनी बहीण डॉ. निमा सोनारे (वय ४३) यांना सांगितली. अर्चना आणि अनिल यांच्यातील वाद विकोपाला गेला. अखेर अनिलने भाऊ राजूच्या मदतीने अर्चनाचा खून करण्याचा कट आखला. ९ एप्रिलला तो भावासह घरी आला. अनिलने अर्चनासोबत वाद घातला. त्यानंतर अनिलने अर्चनाचे पाय पकडले. राजूने लोखंडी रॉडने अर्चनाच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात अर्चना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सेंट्रल लॉक लावून दोघेही तेथून पसार झाले.शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अनिल हा घरी आला. त्याला अर्चना या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. मृतदेह कुजलेला होता. त्याने धायमोकलून रडायला सुरुवात केली.

शेजारी जमले. एका शेजाऱ्याने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला.घराची तपासणी केली असता चोरीच्या उद्देशातून अर्चना यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान अनिल याने बेशुद्ध होण्याचे नाटक केले. अनिल यानेच अर्चनाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. कसून चौकशी केली असता भावाच्या मदतीने खून केल्याचे त्याने मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी अनिल आणि राजूला अटक केली. त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

  • Related Posts

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात शुक्रवारी पहाटे एक अकल्पित आणि धक्कादायक घटना घडली. शहरातील कोसे ले-आऊट परिसरात अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर आकाशातून एक जड धातूचा तुकडा कोसळला.नागपूर जिल्ह्यातील उमरेड…

    कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

    पुण्यातील एका वॉटर पार्कमध्ये एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणीची एक चूक आणि संपूर्ण कुटुंबासोबतचा आनंदाचा क्षण दु:खात बुडाला.पुण्यातील वॉटर पार्कमध्ये एका तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

    कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

    ‘फडणवीसांच्या कटकारस्थानामुळे थोपटे…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा.

    ‘फडणवीसांच्या कटकारस्थानामुळे थोपटे…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा.

    संशयाने संसाराची राखरांगोळी! आधी पत्नीला संपवलं, चौकशीसाठी बोलविलेल्या पतीने पोलिस ठाण्यातच… पुणे हादरलं.

    संशयाने संसाराची राखरांगोळी! आधी पत्नीला संपवलं, चौकशीसाठी बोलविलेल्या पतीने पोलिस ठाण्यातच… पुणे हादरलं.