गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात शुक्रवारी पहाटे एक अकल्पित आणि धक्कादायक घटना घडली. शहरातील कोसे ले-आऊट परिसरात अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर आकाशातून एक जड धातूचा तुकडा कोसळला.नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात शुक्रवारी पहाटे एक अकल्पित आणि धक्कादायक घटना घडली. शहरातील कोसे ले-आऊट परिसरात अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर आकाशातून एक जड धातूचा तुकडा कोसळला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
ही घटना पहाटेचा सुमारास सकाळी चारच्या दरम्यान घडली अचानक स्फोटासारखा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. स्थानिकांनी सांगितले की, मोठा आवाज झाल्यानंतर आकाशातून काहीतरी भारी वस्तू खाली पडल्याचा अनुभव आला.

नंतर तपासणी केल्यावर समजले की, अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर एक मोठा लोखंडी तुकडा कोसळला आहे. या धातूचा तुकडा सुमारे 50 किलो वजनाचा, 10 ते 12 मिमी जाडीचा आणि सुमारे 4 फूट लांबीचा आहे. हा तुकडा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे घराच्या स्लॅबला आणि भिंतीला किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अमेय यांनी तात्काळ उमरेड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी तपासणी केली. प्राथमिक तपासणीत या धातूच्या तुकड्यामध्ये कोणतीही स्फोटक सामग्री नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा तुकडा नागपूर फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या तुकड्याबाबत विविध शक्यतांचा विचार सुरू केला आहे. हा तुकडा उपग्रहाचा अवशेष, एखाद्या अंतराळ यानाचा भाग, किंवा एखाद्या औद्योगिक यंत्रणेचा सुटलेला घटक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीने सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आणि धातूचा तुकडा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. विविध तर्क-वितर्कांना सोशल मीडियावर वाव मिळत असून, अनेकांनी याबाबत कुतूहल व्यक्त केले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. खरी माहिती फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल, तोपर्यंत संयम बाळगावा, असं प्रशासनाने सांगितलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.