कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

पुण्यातील एका वॉटर पार्कमध्ये एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणीची एक चूक आणि संपूर्ण कुटुंबासोबतचा आनंदाचा क्षण दु:खात बुडाला.पुण्यातील वॉटर पार्कमध्ये एका तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वॉटर पार्कमध्ये ‘झिपलायनिंग’ करताना ३० फूट उंचीवरून जमिनीवर पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे. पुणे – सातारा महामार्गावरील वरवे खुर्द गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्कमध्ये शुक्रवारी, १८ एप्रिल रोजी सायंकाळी ही घटना घडली.तरल अरुण आटपाळकर (वय २८, रा. सेलेशिया पार्क, नऱ्हे) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी नंदकिशोर श्रीपती आटपाळकर (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.

तरल ही नंदकिशोर यांची पुतणी आहे. तिच्यासह आटपाळकर कुटुंबीय शुक्रवारी दुपारी राजगड वॉटर पार्कमध्ये गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरल ही तरुणी झिपलायनिंग करण्यासाठी गेली. दरम्यान, रोपवरून चालत जाताना सुरक्षा दोर वरच्या बाजूच्या रेलिंगला लावण्यासाठी तिचा हात पुरत नव्हता. त्यामुळे ती लोखंडी स्टूलवर उभी राहून दोर वरच्या बाजूला लावत होती.अचानक स्टूल हलला आणि तरल सुमारे ३० फूट खाली जमिनीवर कोसळली. तिला तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेले असता, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजगड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम राठोड तपास करत आहेत.सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून अनेक वॉटर पार्कमध्ये मोठी गर्दी होताना दिसते आहे. भोर, वेल्हे तालुक्यांत वॉटर पार्क, फार्म हाउसची संख्या वाढत असून, येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांचीही संख्या सध्या वाढत आहे. या घटनेमुळे वॉटर पार्कमधील सुरक्षाव्यवस्था, उपाययोजना, सुरक्षासाधने व खबरदारी यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे; तसेच या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.