भयंकर! प्रँक जीवावर बेतला, मित्रांनी मिळून तरुणाच्या शरीरात कॉम्प्रेस्ड हवा भरली; चटका लावणारा अंत .

मध्यप्रदेशातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाच्या मित्रांनी विनोदातून त्याच्या शरीरात कॉम्प्रेसरच्या साहाय्याने हवा भरली आहे. ज्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.मध्यप्रदेशातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाच्या मित्रांनी विनोदातून त्याच्या शरीरात कॉम्प्रेसरच्या साहाय्याने हवा भरली आहे. ज्यामुळे तरुणाचा चटका लावणारा अंत झाला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.वृत्तानुसार, मृत तरुणाचे नाव मोतीराम आहे. तो इंदौरच्या तीन इमली पालडा येथील रहिवासी होता. तर जगन्नाथ दाल मिलमध्ये तो काम करत होता. कारखान्याच्या व्यवस्थापकाने सांगितले की, काही सहकाऱ्यांनी त्याची खोड काढली. विनोदाचा भाग म्हणून त्यांनी मोतीरामच्या शरीरात कॉम्प्रेस्ड हवा भरली होती.

ज्यामुळे मोतीराम अस्वस्थ झाला. त्याला ईरिक्षाने तात्काळ हॉस्पिटलमध्ये सोडण्यात आले. पण त्याला घेऊन गेलेला व्यक्ती हॉस्पिटलमधून निघून गेला, जो नंतर परतलाच नाही.डॉक्टरांना तपासणीदरम्यान आढळले की, मोतीरामच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत आहे. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, काही वेळातच त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाने संयोगिता गंज पोलिसांना याप्रकरणी माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी संशयित खून म्हणून तपास सुरु केला.

पण जेव्हा मोतीरामच्या कुटुंबाशी आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा प्रकरणाचे कंगोरे उलगडू लागले.दरम्यान, त्या कारखान्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी, घटना घडलेली नेमकी जागा लपवण्यात आली होती. त्यामुळे ही घटना सीसीटिव्हीत कैद झालेली नाही. पोलिसांनी कारखान्यातून डीव्हीआर जप्त केला आहे आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मॅनेजर धीरज लुवंशी यांचीही सध्या चौकशी सुरू असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.