दौंड तालुक्यातील सहजपूर येथे कालव्यात खेळताना उडी मारल्याने एका तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आसिम मुजावर असे त्याचे नाव आहे. इतर दोन भावंडांना वाचवण्यात यश आले. शेजारील महिलेने आरडाओरड केल्याने निलेश खोमणे यांनी तत्परता दाखवत दोघांना कालव्यातून बाहेर काढले. मात्र, आसिमला वाचवता आले नाही. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.दौंड तालुक्यातील सहजपुर येथून एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे येताना दिसतंय. खेळता खेळता कालव्यात उडी मारल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय. तीन चिमुकले कालव्या शेजारी खेळत होते. मात्र, तिघांनीही अचानक काव्यात उड्या घेतल्या. ही घटना शेजारी राहत असलेल्या महिलेच्या लक्षात आली आणि तिने आरडाओरड केली. यादरम्यान दोन जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, एका चिमुकल्याचा जीव गेला.










