शरद चितळे ‘एमआयडीसी’तील एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याची पत्नी कांचन आशा वर्कर होत्या. त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरदला संशय होता.आशा वर्कर असलेल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने गळा दाबून तिचा खून केला; तसेच स्वत:देखील गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो वाचला. यानंतर या प्रकरणी चिखली पोलिसांनी पतीला शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले असता त्याने पोलिस ठाण्यात फरशी पुसण्याचे द्रव प्यायले. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद रूपचंद चितळे (३३, रा. रुपीनगर, तळवडे) असे विष पिऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. कांचन शरद चितळे (वय २६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.शरद चितळे ‘एमआयडीसी’तील एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याची पत्नी कांचन आशा वर्कर होत्या. त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरदला संशय होता. त्यातून त्याने १३ एप्रिल रोजी राहत्या घरात कांचन झोपेत असताना त्यांचा गळा आवळला.










