
जसप्रीत बुमराहने भर मैदानात जोरदार राडा केल्याचे पाहायला मिळाले. कारण बुमराह करुण नायरवर चांगलाच भडकला होता. नेमंक यावेळी घडलं तरी काय, जाणून घ्या…जसप्रीत बुमराहच्या षटकात मुंबई इंडियन्सच्या बाजूने सामना मुंबई इंडियन्सने जिंकला खरा, पण या सामन्यात जसप्रीत बुमराने जोरदार राडा केल्याचे पाहायला मिळाले. रागाच्या भरात तो करुण नायरला भिडला आणि त्यानंतर काय केलं, हे आता व्हायरल व्हिडिओमध्ये कैद झालं आहे.ही गोष्ट घडली जेव्हा करुण नायर हा धडाकेबाज फटकेबाजी करत होता आणि तो दोन धाव घेण्यासाठी धावला. त्यावेळी जसप्रीत बुनराह हा स्टम्पच्या बाजूला उभा होता. त्यावेळी करुण नायरची बॅट बुमराहला लागल्याचे म्हटले जात होते आणि त्यामुळे बुमराह त्याच्यावर रागावला. पण बुमराह फक्त तेवढ्यावर थांबला नाही तर त्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आऊटमध्ये तो थेट करुणला भिडायला गेला होता.
स्ट्रॅटेजिक टाइम आऊट सुरु झाला आणि त्यानंतर काही वेळातच तो करुण नायरच्या दिशेने गेल्याचे पाहायला मिळाले. रागाच्या भरता जसप्रीत बुमराह हा करुण नायरला सांगत होता की, तुझी चूक नेमकी काय झाली आणि तु काय करायला हवं होतं. यावेळी बुमराह एवढा रागात होता की, त्याला कोण थांबवणार असा प्रश्न होता. रोहित शर्माही तिथेच होता, पण तो बुमरहाचा राग पाहून जागीच थांबला. बुमराह आता रागाच्या भरात काही वाईट करुन बसेल, असे वाटत होते.
पण त्यावेळी मैदानातील पंचांनी हस्तक्षेप केला आणि बुमराहला तिथून दूर केले, नाहीतर या सामन्यात जोरदार बाचाबाची झाली असती.पंचांनी वेळीच या प्रकरणात लक्ष घातले आणि हा प्रकार थांबवला. हे घडल्यानंतर हार्दिक पंड्या तिथेच येत होता. त्यावेळी हार्दिकला भेटायला करुण नायर गेला. करुणने यावेळी नेमकं घडलं तरी काय, हे सांगितलं आणि या प्रकरणाला पूर्णविराम दिला.जसप्रीत बुमराह हा मैदानात शांत असतो, पण तो एकदा भडकला की त्याला थांबवणं सोपं नसतं. हे यावेळी पाहायला मिळालं. बुमराह आणि करुण नायर यांच्यात नेमकं घडलं तरी काय, याचा व्हिडिओ आता जोदार व्हायरल झाला आहे.
Video Player
00:00
00:00