जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला त्यामुळे अख्खा देश हादरला आहे. बीतन हे अमेरिकेत नोकरी करत होते. सुट्टीत कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी मायदेशी आले होते पत्नी मुलासह काश्मीरला गेले त्यावेळी आक्रित घडलेजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कोलकाता येथील 36 वर्षांचे बीतन अधिकारी यांचा मृत्यू झाला. बीतन हे अमेरिकेत नोकरी करत होते. ते पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी भारतात परतले होते. 16 एप्रिल रोजी ते पत्नी सोहिनी आणि तीन वर्षांच्या मुलासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. 24 एप्रिलला ते घरी परतणार होते. पण त्याआधीच त्यांच्या मृत्यूची बातमी आली. या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे.बीतन हे कोलकातामधील पाटुली भागात राहत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांचे शेजारी आणि नातेवाईक दुःखी झाले आहेत.बीतन अधिकारी यांच्या चुलत भाऊ दीपक याने त्यांना काश्मीरला जाण्याचा सल्ला दिला होता. दीपक अधिकारी यांनी सांगितले की, बीतनच्या कुटुंबाला काही आर्थिक अडचणी होत्या.










