पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक, व्हिडीओ शेअर करत मागितली मदत.

 जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपरी-चिंचवडचे 32 पर्यटक अडकले आहेत. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पर्यटक भयभीत झाले असून, प्रशासनाकडे सुरक्षित घरी परतण्यासाठी मदतीची मागणी करत आहेत.जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन व्हॅलीत 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील 32 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. ज्यात रावेत आणि चिंचवड परिसरातील रहिवासी आहेत. आता त्यांच्याकडून मदत ही मागितली जात आहे.

द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोरांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या हल्ल्यामुळे पहलगाम आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या गाड्या स्थानिक प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव जप्त केल्या असून, पुढील आठ दिवस त्या सोडल्या जाणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.यामुळे पर्यटक भयभीत झाले असून ते लवकरात लवकर सुरक्षित घरी परतण्यासाठी प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहेत. सध्या सर्व पर्यटक सुखरूप असले, तरी त्यांच्यावर मानसिक दबाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत बैठक घेतली. आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण बघायला मिळतंय. दहशतवाद्यांविरोधात कडक पाऊस उचलण्याची मागणी केली जात आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही श्रीनगरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले असून, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी दिनेश पाटील यांच्याशी +91 86683 37101 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती अडकलेल्या पर्यटकांकडून करण्यात आली आहे. आता पिंपरी चिंचवड शहरातील अडकलेल्या पर्यटकांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.